पुणे : जुन्नर तालुक्यातील पंचायत समितीच्या १८ गणांचे आरक्षण जाहीर

जुन्नर तालुक्यातील १८ गणांची आरक्षण सोडत जाहीर करताना उपजिल्हाधिकारी श्रीमंत माने, तहसिलदार रविंद्र सबनीस व उपस्थित.
जुन्नर तालुक्यातील १८ गणांची आरक्षण सोडत जाहीर करताना उपजिल्हाधिकारी श्रीमंत माने, तहसिलदार रविंद्र सबनीस व उपस्थित.

जुन्नर, पुढारी वृत्तसेवा : जुन्नर पंचायत समितीच्या १८ गणांच्या आरक्षण सोडतीची घोषणा गुरुवारी (दि. २८) उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्या उपस्थितीत तहसिलदार रविंद्र सबनीस यांनी जुन्नर येथे केली.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार सोडत जाहीर करण्यात आली. तसेच यावेळी मागील चार निवडणुकांचे आरक्षणानुसार चक्राणूक्रमे प्राधान्यक्रमानुसार निश्चिती करण्यात आली. तालुक्यातील अनुसूचित जाती एक जागा (महिला), अनुसूचित जमाती ४ जागा (पैकी २ महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग ४ जागा (पैकी २ महिला) व सर्वसाधारण ९ जागा (पैकी ४ महिला) या १८ जागांचे आरक्षण यावेळी विविध पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष जाहीर करण्यात आले.

तालुक्यातील १८ गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे :

धालेवाडी तर्फे हवेली – अनुसूचित जाती महिला, पाडळी-अनुसूचित जमाती महिला, आळे-अनुसूचित जमाती महिला,
बोरी बुद्रुक-अनुसूचित जमाती पुरुष, बेल्हे-अनुसूचित जमाती पुरुष, पिंपळवंडी-नागरिकरांचा मागासवर्ग प्रवर्ग पुरुष, सावरगाव-नागरिकरांचा मागासवर्ग प्रवर्ग पुरुष, वारुळवाडी-नागरिकरांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, उंब्रज नं.१-नागरिकरांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, राजुरी-सर्वसाधारण महिला, खोडद- सर्वसाधारण महिला, नारायणगाव – सर्वसाधारण महिला, डिंगोरे – सर्वसाधारण महिला, खामगाव- सर्वसाधारण, उदापुर-सर्वसाधारण, तांबे-सर्वसाधारण, येणेरे-सर्वसाधारण, ओतूर-सर्वसाधारण.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news