Republic Day 2023 : भारताचे जागतिक स्तरावर योगदान महत्त्वपूर्ण, पुतिन यांनी पीएम मोदींना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

पुढारी ऑनलाईन : भारताने जगात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. भारताची आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात कामगिरी सर्वत्र ज्ञात आहे. भारत आंतरराष्ट्रीय स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रादेशिक, जागतिक अजेंडावरील महत्त्वपूर्ण समस्यांचे निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे, असे म्हणत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2023) शुभेच्छा दिल्या.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 74 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचे भरभरून कौतुक देखील केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचेही याप्रसंगाचे (Republic Day 2023) औचित्य साधत अभिनंदन केल्याचे रशियन प्रेसचा हवाला देत एएनआयने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पुढे पुतिन यांनी म्हटले आहे की, मला विश्वास आहे की, आम्ही एकत्र काम करून सर्व क्षेत्रांमध्ये परस्पर सामंज्यस्याने द्विपक्षीय संबंध दृढ करू आणि ते निरंतर ठेवण्यास प्रयत्नशील राहू. रशिया आणि भारता या दोन्ही देशातील दृढ द्विपक्षीय संबंधच नागरिकांमध्ये मैत्रीपूर्ण हितसंबंध निर्माण करतील (Republic Day 2023) असेही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news