१३५ बळी घेणाऱ्या मोरबी पुलाची फक्त रंगरंगोटी; नूतनीकरण केलेच नव्हते

१३५ बळी घेणाऱ्या मोरबी पुलाची फक्त रंगरंगोटी; नूतनीकरण केलेच नव्हते
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – गुजरातमधील मोरबी झुलत्या पुलाच्या नूतनीकरणाच्या नावखाली फक्त रंगरंगोटी आणि पॉलीश इतकेच काम केल्याचे, तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तपास अधिकाऱ्यांनी या पुलाची प्राथमिक पाहणी केली आहे, त्यामध्ये बऱ्याच धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. (firm only painted Morbi footbridge)

गुजरातमधील मोरबी हा झुलता पुल कोसळला होता. यात आतापर्यंत १३५ जणांचा बळी गेला आहे. या दुर्घटनेनंतर या पुलाचे नूतनीकरणाचे काम देण्यात आलेल्या ओरेवा कंपनी संशयाच्या घेऱ्यात सापडली आहे.

हा पूल १४५ वर्षं जुना आहे. पुलाचे नूतनीकरण करण्यापूर्वी आणि नूतनीकरणानंतर स्ट्रक्चरल ऑडिट न करणे, आपत्ती काळात लोकांना बाहेर काढण्याची कोणतीही व्यवस्था नसने असे बरेच मुद्दे आतापर्यंत पुढे आले आहेत, असे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या पुलाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.

"२६ ऑक्टोबरला हा पूल खुला केला गेला. त्या आधी या पुलाच्या केबलचे पॉलिश आणि रंगरंगोटी इतकीच कामे केली गेल्याचे दिसते. खराब झालेल्या कोणत्याही केबल बदलल्याचे आम्हाला दिसलेले नाही," असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

या पुलाचे नूतनीकरण डिसेंबर अखेर पूर्ण करायचे होते, पण ही वेळ बदलून दिवाळीच्या सुट्यात पूल खुला करण्याचे ठरले. काही नूतनीकरण केले असले तर ते फक्त झुलत्या भागापुरतेच असावे, असे या वृत्तात म्हटले आहे. या कामासाठी जे मटेरियल वापरण्यात आले, ते कमी दर्जाचे होते, त्यामुळे जास्तीचे वजन पेलू शकले नाही त्यातून पुलाच्या केबल स्नॅप झाल्या असाव्यात, असे वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news