एसी लोकलचे तिकीट दर सामान्य माणसाला परवडतील असे करा; शिवसेना खासदारांची लोकसभेत मागणी

एसी लोकलचे तिकीट दर सामान्य माणसाला परवडतील असे करा; शिवसेना खासदारांची लोकसभेत मागणी
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुंबईत धावणाऱ्या एसी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी एसी लोकलचे तिकीट दर सामान्य माणसाला परवडणारे करावे, अशी मागणी शिवसेना  (Shiv Sena) खासदार राहुल शेवाळे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेच्या अनुदान मागण्यांसंदर्भात बोलताना लोकसभेत केली.

रेल्वे जमिनीवर अनधिकृपणे राहणाऱ्या लाखो नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा रेल्वे विभागाकडून पाठवण्यात आल्या आहेत. मुंबई-ठाण्यासह आसपासच्या परिसरात लाखो नागरिकांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. पंरतु, जोपर्यंत या रहिवाशांच्या पुर्नवसनाचा मार्ग सुटत नाही, तोपर्यंत कुठलीही कारवाई करु नये,अशी मागणी रेल्वे मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे डॉ. शिंदे यांनी केली.

नुकत्याच कार्यान्वित झालेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांवरुन चालवण्यात येणाऱ्या नॉन एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात. शिवाय लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत असलेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत वाढवण्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे, अशी मागणीही डॉ. शिंदे  (Shiv Sena) यांनी केली.

गेल्या वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या पनवेल-कर्जत मार्ग, चिखलोली रेल्वे स्थानकाचे धीम्या गतीने सुरू असलेले काम लवकर पूर्ण करा, दिवा–वसई मार्गावर रेल्वे सेवा वाढवण्यात याव्यात, कल्याण ते बदलापूर या पट्यात तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकांसाठी जमीन अधिग्रहणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी खासदारांनी लोकसभेत केली. कोकण रेल्वे मार्गावरील जास्तीत जास्त गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा द्यावा, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे काम खूपच संथ गतीने सुरु असून हे काम गतीने पूर्ण करत सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गिकांच्या प्रत्यक्ष कामाला देखील लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी ५०० ज्यादा कोचेसची व्यवस्था, प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचा कामाला गती द्यावी, दादर रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्पात फेरीवाले आणि पार्किंगची व्यवस्था करावी, पावसाळ्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी रेल्वेने मुंबई महानगर पालिकेच्या ब्रिमस्टॉवड प्रकल्पाची डिझाईन घ्यावी, यासह इतर विषयांवर खासदार शेवाळे यांनी सूचना केल्या.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : पहिली मालिका ते पहिला क्रश | Rapid Fire with aayush sanjeev

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news