भारतीयांना अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेला Redmi Note 11 Pro & Pro Plus हा Redmi सिरिजमधील हे नवीन स्मार्ट फोन भारतात नुकतेच लाँच झाले आहेत. याची किंमत आणि फिचर्सही काही असेच खास आहेत. कंपनीने दोन दिवसापूर्वी हे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. कमी किंमतीत आणि स्मार्ट फिचर्स या वैशिष्ठ्यांमुळे या स्मार्टफोनची चाहते आतुरतेने वाट पाहत होती.
यापूर्वी कंपनीने Redmi Note या सिरीजमधील Redmi Note 11 आणि Redmi Note 11 S लॉन्च केले आहेत. Redmi Note 11 Pro मधील प्रारंभिक मॉडेलसाठीची किंमत 6GB RAM + 128GB साठी रु. 17,999 पासून सुरू होते, तर 8GB RAM + 128GB किंमत रु. 19,999 असेल. भविष्यात हि किंमत वाढूही शकते असे कंपनीने नमूद केले आहे.
6GB RAM + 128GB ची किंमत 20,999 रुपयांपासून सुरू आहे
8GB RAM + 128GB ची किंमत 22,999 रुपये
टॉप-एंड 8GB RAM + 256GB किंमत 24,999 रुपये
Redmi Note 11 Pro & Pro+ हे 5G स्मार्टफोन आहेत. यामध्ये 6.67-इंचाचा, फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. यात 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. मागील कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, दुय्यम लेन्स 8-मेगापिक्सल अल्ट्रावाईल्ड सेन्सर आहे.
Redmi च्या जुन्या ग्राहकांना Redmi Note या सिरीजमधील जुन्या स्मार्ट फोनची देवाणघेवाण करताना, म्हणजेच Redmi चा जुना फोन देऊन नवीन Redmi Note 11 Pro & Pro+ सिरीज मधील स्मार्टफोन घेताना, यावर २००० रूपयांपर्यंत अतिरिक्त बोनस मिळणार आहे.