Redmi 10 New Smartphone : दमदार फिर्चससह Redmi 10 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

New Launch Redmi 10
New Launch Redmi 10
Published on
Updated on

50 Mp कॅमेरा आणि 6000 mah बॅटरी असलेला दमदार Redmi 10 स्मार्टफोन नुकताच भारतात लाँच झाला आहे. सध्या हा स्मार्टफोन मार्केटमध्ये २० हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये असणाऱ्या स्मार्टफोनला टक्कर देत आहे. चला तर जाणून घेऊया, Redmi 10 या स्मार्टफोनचे फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स…

मार्केटमध्ये नवीन लाँच झालेला Redmi 10 हा स्मार्टफोन Redmi 9 च्या पुढचे मॉडेल आहे. Redmi च्या आत्तापर्यंतच्या मॉडेलमध्ये तुलनेने पूर्णपणे हे भिन्न मॉडेल आहे. Redmi 10 हा स्मार्टफोन सध्या मार्केटमध्ये Realme C35, Motorola Moto E40, Tecno Spark 8 Pro आणि Samsung Galaxy M21 2021 यांच्याशी स्पर्धा असणार आहे.

Redmi 10 New Launch
Redmi 10 New Launch

शाओमीने Redmi 10 हा स्मार्टफोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 10999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 12999 रुपये आहे. हे दोन्ही स्मार्टफोन कॅरिबियन ग्रीन, मिडनाईट ब्लॅक आणि पॅसिफिक ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन Flipkart Mi.com आणि Mi Home या वेबसाइटवर २४ मार्चपासून खरेदी करता येणार आहे. तुम्ही एचडीएफसी बँक कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला या स्मार्टफोन खरेदीवर १००० रुपयांची सूट मिळू शकते.

'हे' आहेत फीचर्स

Redmi 10 या स्मार्टफोनमध्ये 6.61इंचाचा एचडी + एलसीडी डिस्प्ले दिला आहे. पिक्सेल रिझोल्यूशन 1500*720 आहे आणि स्क्रीनच्या संरक्षणासाठी गोरिला ग्लास लावण्यात आली आहे. यात कंपनीने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 11 आधारित MIUI 13 वर चालतो. स्मार्टफोनमध्ये 50 mp प्रायमरी कॅमेरा आणि मागील बाजूस 2mp डेप्थ सेन्सर आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5mp कॅमेराही देण्यात आला आहे. यात पोर्ट्रेट मोड आणि नाईट मोडचाही समावेश आहे. याशिवाय स्मार्टफोनच्या बॅक पॅनल कॅमेरा मॉड्यूलमध्येच फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4G LTE, ड्युअल सिम, वाय-फाय, ब्लूटूथ, GPS आणि USB टाइप सी पोर्टसह येतो.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news