कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला आज रेड अलर्ट

कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला आज रेड अलर्ट

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यासह विदर्भाला उद्या, बुधवारी (दि. 26) अतिसावधानतेचा (रेड अलर्ट) इशारा हवामान विभागाने दिला; तर 27 ते 29 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दिला. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो 24 तासांत अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होत आहे.

ओडिशा, आंध्र प्रदेश किनारपट्टीवर वार्‍यांची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भात पावसाचा जोर वाढतच आहे. मात्र, मराठवाड्यात तुलनेने पावसाचा जोर कमी आहे. केरळ ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवेच्या वरच्या स्तरातील वार्‍यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याला 26 रोजी अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 27 ते 29 पर्यंत या भागांना ऑरेंज अलर्ट दिल्याने नागरिकांनी सर्तक राहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

24 तासांत राज्यातील पाऊस
कोकण ः माथेरान 153, अंबरनाथ 140, कर्जत 129, चिपळूण 108, उल्हासनगर 106, देवरूख 100, तळा 98, पोलादपूर 97.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर 169, लोणावळा 145, गगनबावडा 119, पाटण 62, शाहूवाडी 58, पौड, मुळशी 49, वेल्हे 46.

घाटमाथा : ताम्हिणी 230, कोयना (नवजा) 201, दावडी 196, अंबोणे 190, शिरगाव 17.5, डुंगरवाडी 171, कोयना (पोफळी) 167, लोणावळा (ऑफिस), 136, लोणावळा (टाटा) 122, खोपोली 110, वळवण 101.

असे आहेत अलर्ट
रेड अलर्ट
कोकण ः 26 जुलै
मध्य महाराष्ट्र (घाट) ः 26 जुलै
विदर्भ ः 26 व 27 जुलै

ऑरेंज अलर्ट
कोकण ः 27 ते 29 जुलै
विदर्भ ः 28 व 29 जुलै

यलो अलर्ट
मराठवाडा ः 26 व 2 जुलै

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news