पुढारी ऑनलाईन डेस्क : Realme ने आपल्या नंबर सिरीजमध्ये Realme9 5G आणि Realme9 5G SE हे दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ही सिरीज भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाली असल्याचे, कंपनीने सांगितले आहे. आकर्षक किंमत, फिचर्स आणि यावरील ऑफर्समुळे हा स्मार्टफोन मार्केटमध्ये अनेकांच्या पसंतीस उतरले आहेत. Realme 9 5G आणि Realme 9 5G SE हे दोन्ही स्मार्टफोन आज (दि.14) दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart आणि Realme.com यावर व्रिक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
Realme 9 5G, 4GB RAM + 64GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत रु.14,999 आहे, तर 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत रु. १७,४९९ आहे. हा स्मार्टफोन Meteor Black आणि Stargaze while कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान, Realme 9 5G SE 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे, तर 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत रु. २२,९९९ इतकी आहे. हा स्मार्टफोन Azure Glow आणि Starry Glow रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
स्मार्टफोनच्या खरेदीवर आकर्षक आणि खास ऑफर सुरू आहे. तुम्ही जर Realme 9 5G हा हँडसेट ICICI बँक किंवा SBI बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI वर खरेदी केल्यास रु.1,500 सूट मिळू शकते. तसेच Realme9 5G SE च्या खरेदीवर ICICI बँक किंवा SBI बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर रु. 2,000 इतकी सूट मिळेल.
Realme 9 5G हा स्मार्टफोन 5G ड्युअल-सिम (नॅनो) आहे. 6.5-इंच फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सेल) डिस्प्ले आहे.128GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज तसेच, MediaTek Dimensity 810 प्रोसेसरही आहे. या फोनमध्ये f/1.8 अपर्चर लेन्ससह 48 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर लेन्ससह मोनोक्रोम आणि मॅक्रो फोटोग्राफीसाठी 2-मेगापिक्सेल सेन्सरचा समावेश असलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपही आहे. यामध्ये 5,000mAh बॅटरी आहे.
Realme 9 5G SE या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,412 पिक्सेल) डिस्प्ले आहे, स्मार्टफोन f/1.8 अपर्चर लेन्ससह 48-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, मोनोक्रोम आणि मॅक्रो फोटोग्राफीसाठी f/2.4 अपर्चर लेन्ससह दोन 2-मेगापिक्सेल सेन्सर्ससह तिहेरी कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. Realme 9 5G SE मध्ये Realme 9 5G प्रमाणे f/2.1 अपर्चर लेन्ससह 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा येतो. यामध्ये 128GB पर्यंत इनबिल्ट UFS 2.2 स्टोरेजही आहे. यामध्ये 5,000mAh बॅटरी आहे.