आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरतेवर आरबीआय गव्हर्नरचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरतेवर आरबीआय गव्हर्नरचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता, मान्सून दरम्यान एल निनोचा पडणारा प्रभाव आणि हवामानाशी संबंधी बाबींचे आव्हाने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर उभी आहेत, असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. या आव्हानांचा प्रभाव देशाच्या खाद्य वस्तुंच्या किंमतीवर पडतोय, असेही दास म्हटले आहे.

व्याज दरांचा थेट प्रभाव महागाईशी असतो. मे २०२२ पासून महागाई आटोक्यात आणण्यासाठी रेपो रेट २.५% वाढवण्यात आला आहे. एप्रिल २०२२ मध्ये असलेला ७.८% महागाई दर त्यामुळे मे २०२३ मध्ये कमी होवून ४.२५ टक्क्यांवर आला आहे. महागाई ४% अथवा त्याहून खाली आणण्याचे आमचे लक्ष असल्याचे दास म्हणाले. चलनातून २ हजारांच्या नोटा मागे घेण्याच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर कुठलाही नकारात्मक प्रभाव पडलेला नाही, अशी स्पष्टोक्तीही दास यांनी दिली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news