RBI on 2000 Rupee note | दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद, आता ‘या’ नोटांचे काय करावे? जाणून घ्या १४ प्रश्नांची उत्तरे

डेड अकाऊंट
डेड अकाऊंट
पुढारी वृत्तसेवा : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या नोटांची छपाई बंद केली जाणार असल्याची रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी देण्यात आली. दरम्यान, दोन हजाराच्या नोटा बँकांत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. (RBI on 2000 Rupee note)

१. २००० रुपयांच्या बँक नोटा चलनातून का बंद केल्या जात आहेत?

नोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर चलनाची गरज म्हणून २००० (Rs 2000 ) रुपयांच्या चलनी नोटा सुरू केल्या होत्या. इतर 'चलनी नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर २०१८- १९ मध्ये २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली. आज उपलब्ध असलेल्या २००० रुपयांच्या बहुतेक नोटा मार्च २०१७ पूर्वी जारी करण्यात आलेल्या असून, त्यांचे आयुर्मान संपत आले आहे. शिवाय त्या फार वापरल्याही जात नाहीत. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या क्लीन नोट पॉलिसीनुसार २००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (rbi circular on 2000 rupee note)

२. क्लीन नोट पॉलिसी काय आहे? (RBI on 2000 Rupee note)

जनतेला चांगल्या दर्जाच्या नोटा देण्यासाठी आरबीआयने स्वीकारलेले हे धोरण आहे.

३. २००० च्या नोटांचा कायदेशीर दर्जा कायम राहणार आहे का? 

होय. २००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या असल्या तरी त्यांचा लीगल टेंडर दर्जा पुढे सुरू राहील.

४. २००० रुपयांच्या नोटा सामान्य व्यवहारांसाठी वापरता येतील का? 

होय. सर्वसामान्य जनता २००० रुपयांच्या बँक नोटांचा त्यांच्या व्यवहारासाठी वापर करू शकते मात्र ३० सप्टेंबर २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी या नोटा बँकेत जमा करण्याचे किंवा त्या बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

५. लोकांनी त्यांच्याकडे जमा असलेल्या २००० रुपयांच्या चलनी नोटांचे काय करावे?

 २००० रुपयांच्या नोटा बँकेच्या शाखेत जमा करता येतील किंवा त्या बदलून घेता येतील. तशी सुविधा सर्व बँकांमध्ये ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत उपलब्ध असेल. आरबीआयच्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्येही नोटा बदलून घेण्याची सुविधा ३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असेल.

६ बँक खात्यांत २००० रुपयांच्या नोटा जमा करण्यास काही मर्यादा आहे का?

बँक खात्यांमध्ये कोणत्याही मर्यादेविना नो युअर कस्टमर (केवायसी) निकषांनुसार नोटा जमा करता येतील.

७. एका वेळी २००० रुपयांच्या किती नोटा बदलून घेता येतील ?

एका वेळी रु.२०,०००/- पर्यंत २००० रुपयांच्या – नोटा बदलून घेता येतील,

८. २००० रुपयांच्या चलनी नोटा बिझनेस करस्पॉन्डन्टकडून बदलून घेता येऊ शकेल का?

 खातेदारांना बिझनेस करस्पॉन्डन्टद्वारे दररोज ४,०००/- रुपये इतक्या मर्यादेपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बदलून घेता येऊ शकतील.

९. २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी त्या बँकेचे खातेधारक असणे आवश्यक आहे का?

नाही, एखाद्या बँकेचा खातेदार नसलेली व्यक्ती देखील कोणत्याही बँकेच्या शाखेतून २००० रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकते. एका वेळी केवळ २०,००० रुपयांपर्यंत नोटा बदलून घेता येतील.

१०.व्यवसाय किंवा अन्य कारणांसाठी २०,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेची आवश्यकता असेल तर काय?

बँकेच्या खात्यात नोटा कोणत्याही निर्बंधांशिवाय जमा करता येतील. २००० रुपयांच्या बँक नोटा बँक खात्यात जमा करता येतील आणि या ठेवींच्या बदल्यात रोख रकम काढता येईल.

११. दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी काही शुल्क द्यावे लागेल का?

नाही, नोटा बदलण्याची सुविधा मोफत आहे.

१२. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे का?

२००० रुपयांच्या बँक नोटा बदलणे किंवा जमा करणे या प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती इत्यादींची गैरसोय कमी करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत.

१३. एखादी व्यक्ती २००० रुपये मूल्याच्या नोटा तातडीने जमा किंवा बदलू शकत नसेल तर काय ?

– म्हणूनच नोटा बदलण्याच्या प्रक्रियेसाठी चार महिन्यांहून अधिक कालावधी दिला आहे. नागरिकांनी, त्यांच्या सोयीनुसार दिलेल्या वेळेत या सुविधेचा लाभ घेणे अपेक्षित आहे. (RBI on 2000 Rupee note)

१४. २००० रुपयांच्या नोटा बदलायला किंवा जमा करून घ्यायला बँकांनी नकार दिला तर काय करायचे?

अशा परिस्थितीत ग्राहक प्रथम संबंधित बँकेशी संपर्क साधू शकतात. बँकेने ३० दिवसांच्या कालावधीत प्रतिसाद दिला नाही किंवा बँकेचा प्रतिसाद समाधानकारक नसेल तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एकात्मिक लोकपाल योजना (RB-IOS), आरबीआयच्या तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलवर (cms.rbi.org.in) तकार नोंदवता येईल. (rbi news on 2000 rupee note)

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news