Ravindra Jadeja : अल्लू अर्जुनच्या अवतारात दिसला रविंद्र जडेजा, पुष्पा डायलॉग व्हायरल, पहा व्हिडिओ

Ravindra Jadeja : अल्लू अर्जुनच्या अवतारात दिसला रविंद्र जडेजा, पुष्पा डायलॉग व्हायरल, पहा व्हिडिओ
Published on
Updated on

मुंबई ऑनलाईन डेस्क

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याचा नवा चित्रपट 'पुष्पाः द राइज' (Pushpa: The Rise) सध्या बॉक्सि ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे. भारतीय क्रिकेट संघातील स्टॉर ऑलराउंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील या चित्रपटाच्या प्रेमात पडलाय. रविंद्र जडेजा याने या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग म्हणत याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जडेजाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून जडेजाच्या चाहत्यांना त्याचा हा अंदाज खूप पंसद आला आहे. 'पुष्पा पुष्पराज, मै झुकेगा नही साला…' असा हा डायलॉग आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी त्याला चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिलाय. यात जडेजाचे दाढी, केस वाढलेले दिसतात. त्याचा हा लूक पुष्पा मधील अल्लू अर्जुन सारखा दिसत आहे. जडेजाच्या (Ravindra Jadeja) नव्या अंदाजावर कमेंट्सचा पाऊस सुरु आहे.

'पुष्पाः द राइज' चित्रपट ७ डिसेंबरला रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर याची जोरदार कमाई सुरु आहे. हा चित्रपट तेलुगु, मल्ल्याळम, हिंदी आणि कन्नडमध्ये रिलीज झाला आहे.

रविंद्र जडेजा सध्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतून बाहेर आहे. जडेजा आयपीएल २०२२ पुर्वी सक्रिय आणि तंदुरुस्त होईल असे सांगितले जात आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ….

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news