नुसरत जहाँ म्हणाली, बाळाच्या वडिलांना माहित आहे की ते बाळ कोणाचे? | पुढारी

नुसरत जहाँ म्हणाली, बाळाच्या वडिलांना माहित आहे की ते बाळ कोणाचे?

पुढारी ऑनलाईन ; बंगाली चित्रपट अभिनेत्री आणि लोकसभा खासदार नुसरत जहाँ हिने गेल्या महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला. ही बातमी समजताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच, तिला या मुलाचे वडील कोण? असा प्रश्न विचारुन चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे.

सध्या नुसरत जहाँ हिने आपल्या मुलाचे नाव सांगण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच तीने यापुढेही सिंगल मदर राहणार असल्याचे म्हटले आहे. असे असूनही मुलाच्या वडिलांबद्दल केले जाणारे प्रश्न नुसरत जहाँ हिचा काही पाठलाग सोडत नाही.

नुकत्याच एका कार्यक्रमात तिला पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा नुसरत जहाँला उत्तर द्यावे लागले. एका वृत्तानुसार, बुधवारी कोलकाता येथील एका उद्घाटन सोहळ्यावेळी पत्रकारांनी तिला बाळाच्या पित्याबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर ती म्हणाली की, माझ्या मते हा प्रश्न विचारणे व्यर्थ आहे. एखाद्या महिलेला तिच्या बाळाचे वडील कोण आहेत, हे विचारणं म्हणजे तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणं आहे. माझ्या बाळाच्या वडिलांना माहित आहे की, ते या बाळाचे वडील आहेत. तसेच आम्ही दोघं सोबत बाळाचे अतिशय चांगले संगोपण करत आहोत. सध्या यश दासगुप्ता आणि मी चांगला वेळ घालवत आहोत.

नुसरत जहाँ

बाळाचा चेहरा केव्हा दाखवणार? यावर तिने दिले उत्तर

यांतर एका पत्रकाराने प्रश्न केला की, बाळाचा चेहरा केव्हा दाखवणार? यावर हे तुम्ही त्याच्या वडिलांना विचारा. तोच कुणालाही बाळाला पाहू देत नाही, असे नुसरत यांनी स्पष्ट केले.

यश दास गुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये

नुसरत जहाँ गेल्या वर्षभरापासून अभिनेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तिने निखिल जैन सोबत लग्न झाल्याचे नाकारले आहे. अनेक महिन्यांपासून ती निखिल जैन याच्यापासून वेगळी राहत होती. नुसरत जहाँच्या मुलाचे वडील यश दासगुप्ता असू शकेल असे म्हटले जात आहे. मात्र नुसरत जहाँने बाळाच्या वडिलांबाबत बोलण्यास स्पष्ट करण्यास नकार दिला आहे.

निखिल जैन म्हणाला त्या मुलाचा मी बाप नाही 

नुसरत जहाँचा एक्स पती निखील जैन याला मुलाच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारला असता त्याने नकार देत सांगितले की, नुसरतच्या मुलाशी माझं काही देणं-घेणं नाही. कारण, नुसरत आणि मी 2020 पासून वेगळे राहत होतो. निखील जैन याच्या या विधानाने नुसरत जहाँच्या मुलाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

यश दासगुप्ताने घेतली काळजी

ज्या वेळेस नुसरत आई होणार होती, तेव्हा यश दासगुप्ता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. बाळंतपणापासून ते बाळ आणि नुसरतला घरी आणेपर्यंत त्याने दोघांच्या जवळ रहात काळजी घेतली. यावरून नुसरत जहाँच्या मुलाचे वडील यश दासगुप्ता असू शकतात अशी अटकळ बांधली जात आहे.

Back to top button