Ramp Walk : मुलीला कुशीत घेऊन आईचा फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक (‍व्हिडिओ)

Ramp Walk
Ramp Walk

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही आत्तापर्यंत अनेक रॅम्प वॉक (Ramp Walk) पाहिले असतील. पण तुम्ही कधी कोणत्यातरी आईला आपल्या मुलाला कुशीत घेऊन रॅम्पवर चालताना पाहिले आहे का? झारखंडची राजधानी रांचीमध्ये एका फॅशन शोमध्ये हे दृश्य पाहायला मिळाले आहे. रॅम्प वॉकवर असं भारावून जाणारं दृश्य होतं. जिथे चकाकणाऱ्या लाइट्समध्ये एक मॉडेल आणि एका बाळाची आई एका लहान मुलाला घेऊन रॅम्पवरून खाली उतरते आणि प्रेक्षक उभे राहतात आणि टाळ्या वाजवू लागतात.

चक्क मुलीला कुशीत घेऊन आईचा रॅम्पवॉक

सोशल मीडियावर नेहमी कोणता ना कोणता व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. हा व्हिडिओ पाहून युजर्स भारावून गेले आहेत. व्हिडिओमध्ये एक मॉडेल आपल्या बाळाला कुशीत घेवून रॅम्प वॉकवर वॉक करताना दिसत आहे. तिने आदिवासी पेहराव केलेला दिसत आहे. माहितीनुसार त्या मॉडेलचं नाव आहे अलिशा गौतम (AliSha Gautam). ती आदीवासी फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती. तिला १० महिन्यांची मुलगी आहे. तिचं नाव नायरा आहे. जेव्हा तिने तिची १० महिन्यांची मुलगी नायरा हिच्यासोबत आदिवासी फॅशन शोमध्ये प्रवेश केल्यावर सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात गुंजले. तिने आदिवासी दागिन्यांसह मंगल नाग यांची पडिया साडी घातली होती. तसेच पारंपारिक बेत्रा (मुलाला बांधण्यासाठी कापड) घातला होता. आपल्या नायरासोबत रॅम्प वॉक केला. मुलीसोबत रॅम्पवर चालतानाचा फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  तिचा हा नायरासोबतचा रॅम्प वॉक व्हिडिओ युजर्सना आवडला आहे.

वडिलांनी नेहमी माझ्या निवडीचा आदर केला

मॉडेल अलिशाने तिचे शालेय शिक्षण द एशियन स्कूल डेहराडूनमधून केले आणि NIFT गांधीनगरमधून फॅशनमध्ये पदवी प्राप्त केली. रॅम्प वॉकबाबत ती म्हणाली की, देशात कोणत्याही आईने आपल्या मुलीसोबत रॅम्प वॉक केल्याचे मी पाहिलेले नाही. जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला घेऊन शेतात लागवड करू शकते, तेव्हा घरातील सर्व कामे करू शकते. मग रॅम्प वॉक का नाही?

Ramp Walk
Ramp Walk

अलिशाचे आजोबा बंदी ओराव हे आयपीएस, राजकारणीही आहेत. तर वडील डॉ. प्रकाशचंद्र ओराव हे आदिवासी संशोधन संस्थेचे संचालक आणि राज्यपालांचे ओएसडी राहिले आहेत. आई सरस्वती ओराव या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अलिशा सांगते," माझे वडील खूप कडक होते पण आमच्या स्वप्नांच्या आढ कधीच आले नाहीत. माझ्या आवडीला माझ्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाला कायम राहिला आहे.

Ramp Walk
Ramp Walk

Ramp Walk : अलिशा दोन मुलांची आई 

शालेय शिक्षणादरम्यान अलिशा अॅथलेटिक्समध्ये सक्रिय होती. फुटबॉल संघाची कर्णधारपदही तिने भुषवल आहे. व्हॉलिबॉलची राष्ट्रीय खेळाडू होती. 2021 मध्ये आदिवासी सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि मिसेस श्रेणी विजेतेपद पटकावले. 2015 मध्ये तिने बुटीक सुरू केले, 2020 मध्ये तमायरा क्लाउड किचन सुरू केले. आतापर्यंत तिने 12 फॅशन शोमध्ये भाग घेतला आहे. तिला दोन मुली आहेत.  अलिशा सांगते, " महिलांनो, घर आणि घराबाहेर समतोल साधा आणि तुमची आवड नेहमी जपा."

Ramp Walk
Ramp Walk

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news