ठाणे : खदानीतील स्फोटाच्या हादऱ्याने घराचा स्लॅब कोसळला, महिलेचा मृत्यू; मुलीचा डोळा निकामी | पुढारी

ठाणे : खदानीतील स्फोटाच्या हादऱ्याने घराचा स्लॅब कोसळला, महिलेचा मृत्यू; मुलीचा डोळा निकामी

उल्हासनगर : पुढारी वृत्तसेवा : उल्हासनगर शहरानजीक असलेल्या म्हारळ गावात मोठ्या प्रमाणात खदानी आहेत. ह्या खदानीमध्ये होणाऱ्या स्फोटाच्या हादऱ्याने सुर्या नगरातील कांबळे यांच्या घरांचा स्लॅब कोसळून एक महिला जखमी झाली आहे. तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

यााबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, उल्हासनगर जवळील म्हारळ गावाला मोठ्या प्रमाणात गौण खनिज संपदा मिळाली आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात खदानी आहेत. ह्या खदाणीचे मालक दुपारी तसेच रात्रीच्या वेळी स्फोट घडवून आणतात. त्यामुळे म्हारळ गाव तसेच उल्हासनगर मधील हनुमाननगर मधील घरांना तडे जाणे, पत्र्यावर दगड पडल्याने पत्रे तुटण्याच्या घटना सतत घडत असतात. म्हारळच्या आदिवासी पाडा हा तर ह्या खदानीमुळे विस्थापित होण्याच्या मार्गावर आहे.

म्हारळ गावात सुर्यानगर ही चाळ वस्ती आहे. या चाळीत रंजना उमाजी कांबळे ह्या दोन मुली व एक मुलगा यांच्यासह राहत होत्या. एक वर्षापूर्वी त्यांचे पती उमाजी कांबळे यांचे निधन झाले आहे. रंजना ह्या मोलमजुरी, धुनी भांडी करुन मुलीचे शिक्षण व पालण पोषण करत होत्या. पहाटे तीन ते सव्वातीनच्या सुमारास अचानक घराचा स्लॅब कोसळला. यामध्ये गाढ झोपेत असलेल्या रंजना कांबळे (वय 38) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी प्रज्ञा(वय 18) ही गंभीर जखमी झाली आहे.

मुलीला उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. दरम्‍यान या मुलीचा डोळा निकामी झाला असून सध्या मुंबईतील सायन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने मुलगा राज (वय 16) व मोठी मुलगी प्रिती (वय 20) हे बाजूला झोपायला गेल्याने होते. सुर्यानगर लोकवस्तीच्या जवळपासच दगड खदान असल्याने अनेकांच्या घरांना हादरे बसतात. खडी मशीन व खदानमध्ये होणाऱ्या विस्फोटामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत.

तात्काळ खदानीवर कल्याण तहसिलदार व म्हारळ गाव प्रशासनाने बंदी आणावी अशी मागणी ग्रामस्‍थानी केली आहे.

हेही वाचा  

 कोट्यवधी नागरिकांचा डाटा लीक; दोन भावांना अटक 

कराड : अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले विद्यार्थ्यांमध्ये

मंचर : शेतकर्‍यांना चांगला दूध दर देण्यासाठी प्रयत्न करावा : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल

Back to top button