Ramdas kadam : खेडमध्ये काल राजकीय शिमगा झाला; रामदास कदमांचा ठाकरेंवर निशाणा

Ramdas kadam : खेडमध्ये काल राजकीय शिमगा झाला; रामदास कदमांचा ठाकरेंवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : काल (रविवारी, दि. ५) खेड येथे उद्धव ठाकरे यांनी शिव गर्जना सभेत  सत्ताधारी पक्ष, निवडणूक आयोग आणि कदम पिता-पुत्रांवर यांच्यावर निशाणा साधला. शहरातील महाडनाका येथील एसटीच्या मैदानात हजारोंच्या उपस्थिती ही सभा पार पडली. या पार्श्वभूमीवर आज (दि.६) रामदास कदम (Ramdas kadam) यांनी पत्रकारांशी बोलत असताना, उद्धव ठाकरे यांचा चेहरा भोळा दिसत असला तरीही त्यामागे अनेक चेहरे आहेत हे आम्ही पाहिलंय. असं म्हणतं उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

Ramdas kadam : मला संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला

आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा चेहरा भोळा दिसत असला तरीही त्यामागे अनेक चेहरे आहेत हे आम्ही पाहिलंय. ते १०० वेळा खेडमध्ये आले तरी योगेश कदमांना हरवू शकणार नाहीत. उद्धव ठाकरेंनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची सर्व तयारी मी केली, पण मलाच मला दौऱ्याला येवू दिलं नाही. पुढे बोलत असताना ते म्हणाले, खेडमध्ये काल राजकीय शिमगा झाला. खेडला येवून ठाकरेंनी चूक केली आहे. ठाकरेंच्या सभेला मुंबई ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणांवरुन लोक आणली गेली.

धनुष्यबाण तुम्हाला मिळाला नाही हे दुर्देव

धनुष्यबाण कोणाचा यावरुन  रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला ते म्हणाले, धनुष्यबाण तुम्हाला मिळाला नाही हे दुर्देव आहे. तुमचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. तुमच्या वडिलांच्या विचारांशी तुम्ही बेईमानी केली आहे. धनुष्यबाण सगळ्यांच्याच हातात येत नाही आणि ज्याच्या हातात धनुष्यबाण तो रामभक्त असतो. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची जीभ हासडण्याची भाषा शोभत नाही तुम्हाला. ज्या दिवशी तुम्ही शरद पवारांची संगत केली तेव्हा तुमचं सर्व संपलं. तुम्ही लोकांना भावनिक ब्लॅकमेल करत आहात. बाळासाहेब गेल्यावर उद्धव ठाकरे तुम्ही हुकूमशहा झाला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले सभेत

खेड येथील महाडनाका येथील एसटीच्या मैदानात हजारोंच्या  उपस्थिती शिव गर्जना सभा पार पडली. यावेळी त्यांनी, जे चोरटे आहेत ते शिवसेना नाव चोरू शकतात शिवसैनिक नाही. शिवसेना तोडण्याचे प्रयत्न करणारे लोक निष्ठूर आणि निर्घृण आहेत. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही. ढेकन चिरडायला तोफेची गरज नाही, अशा शब्‍दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्‍लाबोल केला.  ज्यांना आपण भरपूर दिले ते खोक्यात बंद झाले. माझ्या हातात आता काही नाही. तुमची साथ मला आहे. जे चोरटे आहेत ते शिवसेना नाव चोरू शकतात शिवसैनिक नाही." मला निवडणूक आयोगाला सांगायचे आहे की, डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर बघायला या. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही माझ्या वडिलांनी केली आहे. शिवसेना तोडण्याचे प्रयत्न करणारे लोक निष्ठुर आणि निर्घृण आहेत. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही, असेही त्‍यांनी सांगितले. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याशी देश रक्षणाशी काही संबंध नाही ते लोक सत्तेत बसले आहेत त्यामुळे देशात स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news