हनुमान चालीसा मशिदीसमोर म्हणून हिंदू मुस्लिम वाद लावू नका : आठवले

हनुमान चालीसा मशिदीसमोर म्हणून हिंदू मुस्लिम वाद लावू नका : आठवले
नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
हनुमान चालीसा मशिदीसमोर म्हणून हिंदू मुस्लिम वाद निर्माण करु नका. राज ठाकरे हे एका पक्षाचे नेते आहे. त्यांनी भगवे वस्त्र परिधान केले आहे. हे वस्त्र शांततेचं प्रतिक आहे. आम्ही राज ठाकरे यांचा आदर करतो. परंतु त्यांनी वाद लावण्याचे काम करु नये अशी टीका आठवले यांनी केली.
नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आठवले बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांची मशिदीवरील भोंग्याविरोधी भूमिका चुकीची असल्याचे आठवले म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार… 
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंत्री होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाला कधीच संधी मिळाली नाही. त्यानंतर मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच रिपब्लिकन पक्षाला मंत्री होण्याची संधी मिळाली आहे. रिपब्लिकन पक्ष देशभरात मजबूत करावयाचा असून त्यासाठी देशभर फिरत असल्याचे आठवले म्हणाले. मात्र, आज समाज एकत्र राहिला नाही, मी प्रकाश आंबेडकर यांना विनंती करतो की, समाज हितासाठी एकत्रित यावे मी आपल्या मार्गदर्शनाखाली काम करावयास तयार असल्याचे आवाहन आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news