कोल्हापूर : कॅसिनो जुगारात जिंकलेली रक्‍कम हडप करणार्‍या सहा जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

कोल्हापूर : कॅसिनो जुगारात जिंकलेली रक्‍कम हडप करणार्‍या सहा जणांवर गुन्हा दाखल

पेठवडगाव ; पुढारी वृत्तसेवा: ऑनलाईन कॅसिनो जुगारामध्ये जिंकलेली सुमारे 32 लाखांची रक्‍कम हडप करण्याच्या इराद्याने खेळाडूची फसवणूक करणार्‍या सहा जणांवर वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

जीवन बापूसो सुतार-खोचीकर (रा. पेठवडगाव) याने फिर्याद दिली आहे. अक्षय माने, चंद्रकांत जाधव (पेठवडगाव), काबुल (पूर्ण नाव नमूद नाही, रा. आष्टा, जि सांगली), मोहन गणात्राभाई, अनिल निर्मळे, अमित ठक्‍कर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button