पुणे : मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब ‘पीपीपी’वर | पुढारी

पुणे : मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब ‘पीपीपी’वर

पुणे : पुढारी वृत्तसेवा

स्मार्ट सिटी योजनेचा गाशा गुंडाळला जाणार असल्याचे स्पष्ट झाल्याने बालेवाडी येथील प्रस्तावित ‘मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब’ महापालिका आता पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर विकसित करणार आहे.
यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला असून प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार त्यावर निर्णय घेणार आहेत.

राजीव कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त, १५ मे रोजी पदभार स्वीकारणार

महापालिकेच्या बालेवाडी येथील जकात नाक्याच्या जागेवर एकात्मिक वाहतूक सुधारणाअंतर्गत मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यात येणार आहे. हा हब स्मार्ट सिटीकडून विकसित करण्याचे नियोजन होते. महापालिकेच्या मुख्य सभेने 2018 मध्ये त्यास मान्यताही दिलेली होती. त्यानंतर पुन्हा नोव्हेंबर 2021 मध्ये हे हब पालिकेनेच विकसित करावे, असा ठराव मुख्य सभेने केला. त्यानुसार, राज्य शासनाची मंजुरी मिळेल, या भरवशावर पीपीपी तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आयुक्तांनी स्थायी समितीपुढे तो मंजुरीसाठी ठेवला आहे.

नेते चुकले तर जनता धडा शिकवतेच : शरद पवारांचे सूचक विधान, पुन्‍हा जवाहर राठोड यांच्‍या कवितेचे वाचन

स्मार्ट सिटीकडून महापालिकेकडे

बालेवाडी येथील मल्टी मॉडेल हबची प्रस्तावित जागा पालिकेच्या जकात नाक्याची आहे. जकात बंद झाल्याने रिकाम्या पडलेल्या जागेवर स्मार्ट सिटीने शहरातील वाहतूक सुधारणेअंतर्गत एकाच ठिकाणी पीएमपी, खासगी प्रवासी वाहने, एसटी तसेच मेट्रोची सुविधा असावी या उद्देशाने मल्टी मॉडेल हब प्रस्तावित करत पालिकेस प्रस्ताव पाठविला होता. पालिकेने त्यास मान्यताही देत ही जागा स्मार्ट सिटीकडे हस्तांतरित केली. त्यानंतर यातील काही जागा हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी देण्यात आली असून उर्वरित जागेवर ट्रान्स्पोर्ट हब प्रस्तावित होते. मात्र, मुख्य सभेने पालिकेनेच हा हब विकसित करण्याचा ठराव केल्याने आता प्रशासनाने कार्यवाही सुरू केली.

Back to top button