Rakhi Sawant : राखीचा बेडरुममधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

rakhi sawant
rakhi sawant
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री राखी सावंतने तिचा पती आदिल खान दुर्रानीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिची चर्चा होऊ लागलीय. राखी अनेक दिवसांपासून चिंतेत आहे. तिने कालच मीडियाशी बोलताना सांगितले होते की, तिचे डोके काम करत नाहीये. आदिल खानची गर्लफ्रेंड तनु ही प्रेग्नेंट आहे. शिवाय आदिल आधीपासून विवाहित आहे. आता राखीने पतीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बेडरुममधील आहे.

राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून ती आदिल खानसोबत बेडरुममध्ये दिसतेय. त्या दोघांचा हा रोमँटिक व्हिडीओ असून राखीने हा व्हिडिओ सार्वजनिक करण्याचे धाडस केले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये राखीने ब्रोकन हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

एका युजरने लिहिलं-तुझं माहित नाही राखी पण तुझं हे सगळं बघून बघून मी डिप्रेशनमध्ये गेलीय. कृपया आदिलला बाजूला कर आणि जीवनात पुढे जा. दुसऱ्या युजरने लिहिलं-अनफॉलो करत आहे. थकली आहे तुझे हे ड्रामे पाहून बाय बाय. तिसऱ्या युजरने लिहिलं आहे- राखीला वेड लागलं आहे.

राखीने पती आदिल खानवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने तिचे पैसे चोरल्याचे म्हटले आङे. शिवाय मारहाण केली असून तिला धोका दिल्याचं म्हटलं आहे. तिने पतीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आदिलला ताब्यात घेतले होते. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news