Raju Srivastava Health : दुसऱ्या दिवशीदेखील राजू यांचा ताप कमी नाही

Raju Srivastava
Raju Srivastava

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉमेडियन-अभिनेता राजू श्रीवास्तव (Raju Srivastava Health) यांना गेल्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून राजूच्या प्रकृतीत सतत चढ-उतार होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना नुकतेच व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते, मात्र ताप आल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. (Raju Srivastava Health)

राजू यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राजू यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होत आहे. तरीही तो व्हेंटिलेटरवर आहे.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव २४ दिवसांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल आहे. त्याच्या तब्येतीत सतत चढ-उतार दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून राजूचा ताप उतरत नव्हता. दुसऱ्या दिवशीही ताप कायम आहे. डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news