पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार रजनीकांत हे आपल्या मुलीच्या चित्रपटात कॅमियो करताना दिसणार आहेत. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याचा चित्रपट 'लाल सलाम'चा (Laal Salaam) ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात विक्रांत आणि विष्णू मुख्य भूमिकेत आहेत. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. ऐश्वर्याने चित्रपट निर्माती म्हणून कमबॅक केलं आहे. 'Laal Salaam' ९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात रिलीजसाठी सज्ज आहे. चित्रपटाचा ऑडियो लॉन्च २६ जानेवारी रोजी चेन्नईच्या एका कॉलेजमध्ये झाला होता.
संबंधित बातम्या –
५ फेब्रुवारी रोजी ऐश्वर्या रजनीकांत आणि 'लाल सलाम'च्या टीमने चित्रपटाच्या ट्रेलरची यूट्यूब लिंक जारी केले. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, 'लाल सलाम' समाजासाठी एक महत्त्वाचा संदेश देण्याबरोबरचं एक हार्ड-हिटिंग स्पोर्ट्स ड्रामा देखील आहे.
हा चित्रपट लायका प्रोडक्शन्सच्या सुबास्करा अल्लिराजाहने निर्मिती केली आहे. चित्रपटामध्ये विष्णू विशाल, विक्रांत, रजनीकांत यांच्या शिवाय विग्नेश, लिविंगस्टन, सेंथिल, जीविता, केएस रविकुमार, थम्बी रमैया यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात कपिल देव यांचाही कॅमियो आहे.