राजस्‍थान काँग्रेसमध्‍ये ‘एकजूट’!, एकत्रित निवडणूक लढविण्‍याचा निर्धार

Congress
Congress

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आम्ही विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणत्‍याही राज्‍यात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करत नाही, असे स्‍पष्‍ट करत राजस्थानची निवडणूक आम्ही एकदिलाने लढवू, अशी माहिती  काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी आज ( दि. ६ )  माध्‍यमांशी बोलताना दिली.  त्‍यांच्‍या विधानामुळे राजस्‍थानमधील पायलट विरुद्ध गहलाेत यांच्‍यातील वादावर पडदा टाकण्‍यात पक्षश्रेष्‍ठींना यश आल्‍याचे मानले जात आहे. (Rajasthan Politics)

दरम्यान, राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी मोठा खुलासा करत, 'राजस्थानमधील आगामी निवडणुकांसाठी अर्थपूर्ण चर्चा झाली आहे. भाजपने बेरोजगारी, भ्रष्टाचाराच्या समस्येपासून लोकांचे लक्ष वळवण्याचा खूप प्रयत्न केला आहे. पक्षाने त्याची दखल घेतली असून सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. पक्षाने मला यापूर्वी जी काही भूमिका दिली आहे, त्याबाबत मी नेहमीच माझे कर्तव्य पार पाडत आलो आहे, भविष्यातही मी तेच करत राहीन,' असे त्यांनी स्पष्ट केले.

Rajasthan Politics : सप्टेंबरमध्‍ये उमदेवार यादी जाहीर करणार

राजस्‍थान काँग्रेसच्‍या आज मुख्‍यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस प्रमुखांसह बैठक झाली. यावेळी २९ नेत्‍यांनी सहभाग घेतला. राजस्थान काँग्रेसमध्ये एकजूट असेल तर काँग्रेस राजस्थान निवडणुकीत जिंकू शकते, असा निर्णय सर्व नेत्यांनी एकमताने घेतला. आज सर्व नेत्यांनी एकदिलाने निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. विजयी क्षमतेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असेही राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रभारी आणि काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल

अंतर्गत राजकारणावर पक्षाबाहेर बोलण्‍याचा स्वातंत्र्य कोणालाही नाही

प्रत्येकाने कडक शिस्तीचे पालन करायचे ठरवले आहे. कोणत्याही मुद्द्यांवर पक्षांतर्गत चर्चा करायची असते आणि पक्षाच्या अंतर्गत राजकारणावर पक्षाबाहेर बोलण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नाही. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा केसी वेणुगोपाल यांनी यावेळी दिला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news