टोमॅटो अखेर शंभरी पार ! आठवड्यामध्ये दरात आणखी वाढ होणार असल्याची माहिती

टोमॅटो अखेर शंभरी पार ! आठवड्यामध्ये दरात आणखी वाढ होणार असल्याची माहिती

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या पावसामुळे भाजी मंडईत सर्व भाजीपाला महागला आहे. यामध्ये टोमॅटोने शंभरी पार केली आहे. 130 ते 140 रुपये दराने त्याची किरकोळ बाजारात विक्री होत आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये टोमॅटो मातीमोल भावाने बाजारात विकला जात होता. बर्‍याचदा पंधरा तर काही वेळा 10 रुपये प्रति किलो दराने विक्री झाली. मात्र पावसामुळे टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुढील आठवड्यामध्ये दरात आणखी वाढ होणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news