Rainfall Forecast : राज्यात २२ ते २४ जून दरम्यान पावसाचा अंदाज

Rainfall Forecast : राज्यात २२ ते २४ जून दरम्यान पावसाचा अंदाज

पुढारी ऑनलाईन : तळ कोकणातील मान्सून अद्याप तरी पुढे सरकलेला नाही. परंतु मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान २२ ते २४ जून दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता (Rainfall Forecast) हवामान विभाकडून वर्तवली आहे, आयएमडी पुणेचे विभागप्रमुख के.एस. होसाळीकर यांनी यासंबंधीचे ट्विट केले आहे.

होसाळीकर यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, २३, २४ जूनला संपूर्ण कोकणात व्यापक स्वरूपात पाऊस पडणार आहे. तर २२ ते २४ जूनला उत्तर आणि दक्षिण कोकण, विदर्भातील बऱ्यापैकी भागात पावसाची शक्यता आहे. तर संपूर्ण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची (Rainfall Forecast) शक्यता आहे, असे होसाळीकर यांनी सांगितले आहे.

Rainfall : पुढील तीन दिवसात मान्सून मुंबईत-डॉ. अनुपम कश्यपी

पुढील ७२ तासांमध्ये मान्सून मुंबई,- पुण्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने सोमवारी वर्तविला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे मान्सून आणखी सक्रिय होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे रत्नागिरीमध्ये मान्सूनचा थांबलेला प्रवास आता पुढे सरकून पुढील तीन दिवसांमध्ये मान्सून मुंबईत आगमन होऊ शकतो, असे हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news