Railway News | रेल्वे पुनर्विकास कामाचा लासलगावला प्रारंभ

लासलगाव : अमृत भारत स्टेशन योजना पुनर्विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर.
लासलगाव : अमृत भारत स्टेशन योजना पुनर्विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर.

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

येथे अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत (Amrit Bharat Station yojana 2024) पुनर्विकास कामाचा प्रारंभ व लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाला. लासलगाव रेल्वेस्थानक आवारात हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी आमदार कल्याणराव पाटील होते. यावेळी रेल्वेचे सीनियर डी. एम. राहुल अग्रवाल, डॉ. उमेश काळे, टाकळी विंचूरच्या सरपंच अनिता जाधव, सुवर्णा जगताप, डी. के. जगताप, कोटमगावचे माजी सरपंच तुकाराम गांगुर्डे उपस्थित होते. सुवर्णा जगताप यांनी कोरोना काळातील बंद झालेले देवगिरी एक्स्प्रेस, शालिग्राम एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस, मुंबई हावडा एक्स्प्रेस यांचे थांबे पूर्ववत करावे व गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा मनमाडहून सोडावी, अशी मागणी केली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news