Railway News | नाशिकमध्ये महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प आणणार : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

नाशिकरोड : रेल्वे कर्षण कारखान्यात रेल्वे चाकांच्या निर्मिती तसेच दुरुस्ती प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे. समवेत खासदार हेमंत गोडसे आणि मान्यवर. (छाया : उमेश देशमुख)
नाशिकरोड : रेल्वे कर्षण कारखान्यात रेल्वे चाकांच्या निर्मिती तसेच दुरुस्ती प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे. समवेत खासदार हेमंत गोडसे आणि मान्यवर. (छाया : उमेश देशमुख)

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याअगोदर काँग्रेसच्या ६२ वर्षांच्या कालखंडात २००९ पर्यंत केंद्राकडून महाराष्ट्राला अवघा ११ कोटींच्या आत निधी मिळत होता. मोदी यांच्यामुळे २०२३-२४च्या केंद्रीय अर्थसंकल्पात १३ हजार कोटी आणि २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात १५ हजार ५०० कोटींची तरतूद महाराष्ट्रातील रेल्वेकामासाठी करण्यात आली. या वरून रेल्वेची वाटचाल कोठे सुरू आहे ते दिसते. मोदींच्या काळात वेगाने रेल्वेकामे सुरू आहेत. रेल्वेच्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी पायाभूत सुविधा नाशिक येथे उपलब्ध असून, पुढील काळात अजून काही महत्त्वाचे प्रकल्प नाशिक येथे येणार असल्याचे संकेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले.

एकलहरे येथे उभारलेल्या रेल्वे व्हील कारखान्याचे उद्घाटन सोमवारी (दि. २६) केल्यानंतर मंत्री दानवे बोलत होते. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज‍िल्हाध्यक्ष सुनील आडके, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गणेश कदम, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, मुख्य कारखाना व्यवस्थापक अलोक शर्मा, आयमाचे धनंजय बेळे, जयश्री खर्जुल, शिवाजी गांगुर्डे, इति पांडे, अलोक शर्मा, नारायण बावस्कर, नरेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. (TMW-Traction Machine workshop NasikRoad)

मंत्री दानवे म्हणाले, एकलहरे येथील रेल्वे व्हील वर्कशॉपमुळे (Rail Wheel Factory) रेल्वेच्या नवीन चाकांच्या असेम्बलीसाठी आणि चालवलेल्या चाकांच्या संचाच्या दुरुस्तीसाठीची सुविधा उपलब्ध होणार आहे. चाकांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी या विभागात व्हील वर्कशॉपची खूप गरज होती. चाकांच्या उपलब्धतेमुळे वेळेची बचतदेखील होणार आहे व रेल्वे प्रवाशांना अधिक सुखकर प्रवासाचा अनुभव येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात रेल्वेचे जाळे झपाट्याने विस्तारत असल्याने व्हील वर्कशॉप (Rail Wheel Factory) हे अत्यंत उपयोगी ठरणार आहे. (TMW-Traction Machine workshop NasikRoad)

पूर्वी रेल्वे बोर्ड आणि केंद्र सरकार यांचे वेगवेगळे अर्थसंकल्प सादर होत असत. रेल्वेला मिळालेल्या महसुलात केंद्र सरकार अल्पसा निधी टाकत असे. परिणामी तोकड्या निधीचे बजेट सादर होऊन रेल्वेची प्रस्तावित कामे मार्गी लागण्यास मोठा विलंब होत असे. परंतु, मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून एकच अर्थसंकल्प सादर होत आहे. गेल्या वर्षी सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचा निधी केंद्राने बोर्डाला दिला. यामुळे रेल्वे संबंधीच्या प्रकल्पांची कामे देशभरात वेगाने सुरू आहेत. २०४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होणार असून, जगातील विकसनशील देशांत भारत अव्वल क्रमांकावर येण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी अहोरात्र काम करत आहेत. परिणामी २०४७ सालापर्यंत भारत जगासमोर निश्चितच एक विकसनशील देश म्हणून उदयास येणार असल्याचेही दानवे म्हणाले. (TMW-Traction Machine workshop NasikRoad)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news