राहुल गांधीनी बदलला ट्विटर बायो…’Member of Parliament’

राहुल गांधीनी बदलला ट्विटर बायो…’Member of Parliament’
पुढारी ऑनलाईन डेस्क : मानहानी प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाकडून दिलासा मिळाल्‍यानंतर काँगेस नेते राहुल गांधी यांना आज ( दि.७) लोकसभा सचिवालयाने पुन्‍हा खासदारकी बहाल केली. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली तेव्हा त्यांनी ट्विटरचा बायो बदलुन 'Dis'Qualified MP' लिहिले होते. आज त्यांनी  खासदारकी बहाल झाल्यानंतर आपल्या ट्विटर बायोमध्ये 'Member of Parliament' असं लिहलं आहे. (Rahul Gandhi Twitter Bio)

Rahul Gandhi : काय आहे प्रकरण?

सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना केरळमधील वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणात सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरवित त्यांना दोष वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ही खासदारकी रद्द झाली होती. गुजरात उच्च न्यायालयाने शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय हा एकमेव आधार गांधी यांच्यासमोर राहिला होता. अखेर गत आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना दिलासा दिला होता.

कर्नाटकमधील कोलार येथे 13 एप्रिल 2019 रोजी निवडणूक प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप झाला होता. 'निरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी या आडनावामध्ये कोणती समानता आहे?, सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?' असे गांधी त्यावेळी म्हणाले होते. यावर गुजरातमधील भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात कलम 499 आणि 500 अंतर्गत अवमाननेचा खटला दाखल केला होता.

Rahul Gandhi Twitter Bio : राहुल गांधींना पुन्‍हा खासदारकी बहाल

मानहानी प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाकडून दिलासा मिळाल्‍यानंतर काँगेस नेते राहुल गांधी यांना आज ( दि.७) लोकसभा सचिवालयाने पुन्‍हा खासदारकी बहाल केली. लाेकसभा सचिवालयाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.  मानहानी प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत न्‍यायालयाने दाेन वर्षांची शिक्षा सुनावली हाेती. या निकालानंतर मार्च २०२३ मध्‍ये त्‍यांची खासदारकी रद्द करण्यात आली हाेती.

'Dis'Qualified MP' ते 'Member of Parliament'

राहुल गांधी ट्विटर बायो: काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांना त्यांच्या 'मोदी आडनाव' टिप्पणीबद्दल गुन्हेगारी बदनामी केल्याबद्दल दोषी ठरवल्यानंतर त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. त्याचवेळी, राहुल यांनी त्यांच्या बायोमध्ये स्वतःला अपात्र खासदार म्हणून नमूद केले होते. आज त्यांनीखासदारकी बहाल झाल्यानंतर आपल्या ट्विटर बायोमध्ये 'Member of Parliament' असं लिहलं आहे.
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news