Rahul Gandhi Twitter Bio : खासदारकी रद्द झाल्याने राहुल गांधींनी बदलला ट्विटरचा बायो, लिहिले- ‘Dis’Qualified MP’

Rahul Gandhi Twitter Bio : खासदारकी रद्द झाल्याने राहुल गांधींनी बदलला ट्विटरचा बायो, लिहिले- ‘Dis’Qualified MP’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rahul Gandhi Twitter Bio : राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसकडून दिल्लीत 'संकल्प सत्याग्रह' करण्यात येत आहे. दुसरीकडे पक्षाकडून या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी स्वत:ला 'अपात्र' खासदार घोषित केले आहे. खासदारकी गमावल्यानंतर राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये मोठा बदल केला आहे. यामध्ये त्यांनी स्वत:ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आणि 'अपात्र' खासदार असल्याचा उल्लेख केला आहे.

राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून खासदार होते. पण मानहानीच्या एका खटल्यात सुरत येथील न्यायालयाने त्यांना 2 दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 'मोदी आडनाव'बाबत केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबाबत हा निर्णय देण्यात दिला होता. न्यायालयाचा निर्णय येताच दुस-या दिवशी राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले. लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी याबाबतचा निर्णय जाहीर केला. (Rahul Gandhi Twitter Bio)

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे देशभरात गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येत आहे. या एकदिवसीय निदर्शनास 'संकल्प सत्याग्रह' म्हटले जात आहे. दिल्लीतही काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी एकत्र येत महात्मा गांधींच्या 'राज घाट' येथील स्मृतीस्थळावर जाऊन परवानगी विना निदर्शने केली. (Rahul Gandhi Twitter Bio)

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news