Tejashwi Yadav : ‘फक्त गुजराती लोकच गुंड’, राहुल गांधींनंतर तेजस्वी यादव यांना वादग्रस्त वक्तव्य भोवणार! | पुढारी

Tejashwi Yadav : ‘फक्त गुजराती लोकच गुंड’, राहुल गांधींनंतर तेजस्वी यादव यांना वादग्रस्त वक्तव्य भोवणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘फक्त गुजराती लोकच गुंड असू शकतात’ या वक्तव्याने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे अडणीत आले आहेत. गुजराती समाज तेजस्वी यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. छत्तीसगडच्या धमतरी पोलिस ठाण्यात थेट उपमुख्यमंत्र्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी समाजातर्फे निवेदन देण्यात आले आहे.

यापूर्वी ‘मोदी’ आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी सूरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावलेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचा आदेश जारी करून ही मोठी कारवाई केली. या प्रकरणानंतर आता बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांचे वक्तव्य निशाण्यावर आले आहे.

शनिवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तेजस्वी (Tejashwi Yadav) यांची कथित नोकरीसाठी जमीन घोटाळ्याप्रकरणी सुमारे आठ तास चौकशी केली. या कारवाईमुळे तेजस्वी यादव त्रस्त असल्याचे दिसत आहे. त्यातूनच ते केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. तेजस्वी यादव यांनी छाप्यांसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले. त्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर वारंवार निशाणा साधत आहेत. राजकीय वक्तव्य करताना तेजस्वी म्हणाले होते की, या देशात दोन गुंड आहेत. आजच्या देशाच्या परिस्थितीत पाहिले तर फक्त गुजरातीच गुंड असू शकतात. तपास यंत्रणांनी त्यांच्यावर कारवाई करताना अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.’

या विधानानंतर गुजराती समाज तेजस्वी यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. या प्रकरणी धमतरी एसपींच्या नावाने कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रसाद वैद्य यांना निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये तेजस्वी यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

हेही वाचा

Back to top button