यंग इंडियाची मानसिकता विराट कोहलीसारखी : रघुराम राजन असं का म्‍हणाले?

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन. ( संग्रहित छायाचित्र )
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन. ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जग बदलू इच्छिणाऱ्या उद्योजकांशी बोलणे खरोखर हृदयस्पर्शी आहे, ज्यापैकी बरेच जण भारतात राहून आनंदी नाहीत. त्यांना खरोखरच जागतिक स्तरावर अधिक विस्तार करायचा आहे. मला वाटते की, 'मी दुसऱ्या क्रमांकावर नाही तर पहिल्‍याच क्रमाकांवर असला पाहि'जे, अशी यंग इंडियाची मानसिकता विराट कोहलीसारखीच आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्‍यक्‍त केले. अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये 'मेकिंग इंडिया ॲन ॲडव्हान्स्ड इकॉनॉमी 2047: व्हॉट टेक टेक' या विषयावर ते बोलत होते. ( Raghuram Rajan says young India has a 'Virat Kohli mentality' )

आम्ही लोकशाही लाभांश गमावत आहोत

या वेळी रघुराम राजन म्‍हणाले की, "मी भारताच्‍या ६ टक्के विकास दराबाबत बोललो. कारण भारत लोकशाही व्‍यवस्‍थेपासून मिळणार्‍या लाभघंशाचा लाभच घेत नाही. ६ टक्‍के  विकास दर हा लोकशाही लाभांशाच्या मध्यभागी आहे. चीन आणि कोरिया यांनी जेव्‍हा नफा कमावला तेव्‍हा ते अगदी तळाला होते. म्हणूनच जेव्हा आम्ही ६ टक्‍के विकास दराला चांगले म्‍हणतो तेव्‍हा आम्ही लोकशाही लाभांश गमावत आहोत." ( Raghuram Rajan says young India has a 'Virat Kohli mentality' )

नोकऱ्यांचे स्वरूप बदलणे आवश्यक

बेरोजगारीच्‍या प्रश्‍नावर राजन म्हणाले की, "आम्हाला प्रश्न पडतो की, नोकऱ्या कशा निर्माण करायच्या? माझ्या मनातले उत्तर अंशतः आपल्याकडील लोकांच्या क्षमता वाढवण्यासाठी आहे. नोकऱ्यांचे स्वरूप बदलले पाहिजे आणि दोन्ही आघाड्यांवर काम करण्याची गरज आहे."

बेरोजगारीची समस्‍या गेल्‍या काही दशकांपासूनची

या वेळी रघुराम राजन यांनी भारताच्या चिप उत्पादनावर अब्जावधी डॉलर्स खर्च करत असल्याची टीका केली, " चिप कारखान्यांचा विचार करा. त्यामुळे अब्जावधी डॉलर्सची सबसिडी चिप उत्पादनावर दिली जाणार आहे. चामड्यासारख्या अनेक नोकऱ्यांची क्षेत्रे चांगली कामगिरी करत नाहीत. आमची या क्षेत्रांमध्ये घसरण सुरु आहे. आमच्याकडे नोकरीची समस्या अधिक आहे यात आश्चर्य नाही. नोकरीची समस्या गेल्या 10 वर्षात निर्माण झाली नसून, गेल्या काही दशकांपासून ती वाढत आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

यंग इंडियाची मानसिकता विराट कोहलीसारखी

तरुण भारतीयांची मानसिकता विराट कोहलीसारखी आहे. ते अशा ठिकाणी जातात जिथे त्यांना अंतिम बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे खूप सोपे वाटते. त्यांना खरोखरच स्‍वत:चा जागतिक स्तरावर अधिक विस्तार करायचा आहे. मी जगात कोणापेक्षाही दुस-या क्रमांकावर नाही, अशी विराट कोहलीची मानसिकता असणार्‍या यंग इंडियातील तरुण नवसंशोधक सिंगापूर किंवा सिलिकॉन व्हॅलीला जात आहेत. म्‍हणूनच भारताने मानवी कौशल्य सुधारण्‍यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असा सल्‍लाही त्‍यांनी भारत सरकारला दिला.

बरेच जण भारतात राहून आनंदी नाहीत…

"आम्हाला हे विचारावे लागेल की त्यांना भारतात राहण्याऐवजी भारताबाहेर जाण्यास भाग पाडणारे काय आहे? पण यापैकी काही उद्योजकांशी बोलणे आणि जग बदलण्याची त्यांची इच्छा पाहणे आणि त्यांच्यापैकी बरेच जण भारतात राहून आनंदी नाहीत हे खरोखर हृदयस्पर्शी आहे, अशी खंतही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news