Raghav Chadha moves SC : आप खासदार राघव चड्ढा यांची सुप्रीम कोर्टात धाव; जाणून घ्या कारण

खासदार राघव चड्ढा
खासदार राघव चड्ढा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आप खासदार राघव चड्ढा हे नुकतेच विवाह बंधनात अडकले. त्यांनी बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राशी सात फेरे घेतले. तत्पूर्वी त्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, राज्यसभा विशेषाधिकार समितीच्या निलंबनाच्या निर्णयाला आव्हान देत आप खासदार राघव चड्ढा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Raghav Chadha moves SC)

भाजप खासदारांच्या तक्रारीनंतर चड्ढा यांना 11 ऑगस्ट रोजी राज्यसभेतून "विशेषाधिकार भंग" प्रकरणी अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले होते. या निलंबनाविरोधात चड्ढा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर हे निलंबन "मनमानी आणि बेकायदेशीर" असल्याचे राघव चड्ढा यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीने याप्रकरणी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच हा मुद्दा अनिश्चित काळासाठी विलंबित होत असल्याचेही आप खासदार राघव यांनी म्हटले आहे. (Raghav Chadha moves SC)

Raghav Chadha moves SC: खासदारांच्या खोट्या सह्या केल्याप्रकरणी कारवाई

आपचे राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा यांचे राज्यसभेतून निलंबन करण्यात आले आहे. दिल्ली प्रस्तावात फेरफार केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी ही कारवाई होती. दिल्ली सेवा विधेयकाबाबत पाच खासदारांच्या खोट्या सह्या केल्याप्रकरणी आप खासदारावर ही कारवाई करण्यात आली आहे. राघव चड्ढा यांच्यावर खासदारांचा समावेश असलेल्या समितीच्या स्थापनेचा प्रस्ताव त्यांच्या मंजुरीशिवाय ठेवल्याचा आरोप आहे, जे नियमांचे उल्लंघन आहे. आता विशेषाधिकार समिती या प्रकरणाची चौकशी करेल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत राघव चड्ढा राज्यसभेतून निलंबित राहणार आहेत, असेही धनखड यांनीस्पष्ट केले आहे.

समितीच्या शिफारशीचा अहवाल येईपर्यंत निलंबन कायम

विशेषाधिकार समितीचा अहवाल मिळेपर्यंत मी राघव चड्ढा यांना विधान परिषदेच्या सेवेतून निलंबित करत असल्याचे धनखड यांनी म्हटले आहे. यापूर्वी २४ जुलै, २०२३ रोजी आप खासदार संजय सिंह यांचेही केलेले निलंबन कायम राहिल. जोपर्यंत विशेषाधिकार समितीच्या शिफारशीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे, असे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहात सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news