Pushpa : The Rise रश्मिका मंदानाचा सामी सामी गाण्यावर जबरदस्त डान्स

rashmika mandana
rashmika mandana

पुढारी ऑनलाईन डेस्क

अल्लू-अर्जुन-रश्मिका मंदानाचा पुष्पा (Pushpa : The Rise) या चित्रपटाची चर्चा होताना दिसतेय. रश्मिका मंदानाचा एक व्हिडिओ सध्या इन्सेटाग्रामवर खूप व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसतेय. चेक्स शर्ट आणि जीन्स शॉर्टवर ती पुष्पा या चित्रपटातील सामी सामी या गाण्यावर ठुमके लगावताना दिसतेय. (Pushpa : The Rise)

पुष्पा चित्रपटाच्या प्रमोशनवेळीही तिने स्टेजवर या गाण्यावर डान्स करून दाखवला. पुष्पा द राईज या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. तर निर्माते नवीन येरनेनी आणि वाय रवी शंकर आहेत. यामध्ये नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या मुख्य भूमिका आहेत. Fahadh Faasil , Dhanunjay, Rao Ramesh, Suneel, Anasuya Bharadwaj & Ajay Ghosh यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पुष्पा मध्ये पाहायला मिळतात.

रिलीज झाला पुष्पा

साऊथ स्टार अल्लू अर्जुन-रश्मिकाचा पुष्पा चित्रपट आज रिलीज झाला. या चित्रपटाची प्रतीक्षा फॅन्सना लागून राहिली होती. अल्लू अर्जुन-रश्मिकाला फॅन्स भरभरून शुभेच्छा देत आहेत.

पुष्पा दोन भागांमध्ये रिलीज होणार आहे. आज पहिला भाग रिलीज जाला आहे. रिपोर्ट्सनुसार, दुसरा भाग पुढील वर्षी रिलीज होईल. साऊथ स्टार राम चरणने सोशल मीडियावर अल्लू अर्जुनला चित्रपटाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देवी श्री प्रसाद यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. प्रेक्षकांना तेलुगु भाषेतील हा चित्रपट मल्याळम, तमिळ, हिंदी आणि कन्नड भाषेत डब केलेला पाहायला मिळेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news