मंगलम शीनू : पुष्पा चित्रपटात ‘या’ विलेनविषयी माहितीये का?

pushpa movie mangalam srinu
pushpa movie mangalam srinu
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

पुष्पा चित्रपटात कुठलाही विचार न करता खून, हत्या करणारा विलेन मंगलम शीनू याने आपल्या अभिनयाची छाप पुन्हा एकदा सोडलीय. साऊथच्या या प्रसिध्द अभिनेत्याचे नाव सुनील असे आहे. पुष्पा चित्रपटात त्याने मंगलम शीनू हे विलनचे पात्र साकारले होते. सुनीलचं करिअर संघर्षाने भरलेले आहे. जाणून घेऊया मंगलम शीनू याच्याविषयी थोडेसे…

pushpa movie mangalam srinu
pushpa movie mangalam srinu

सुनीलने पुष्पा चित्रपटात चंदन तस्कर  Mangalam Srinu ची भूमिका साकारलीय. सुनीलने आपल्या करिअरमध्ये १७७ हून अधिक चित्रपटात काम केलं आहे. सुनीलने पुष्पामध्ये खतरनाक विलेनची भूमिका साकारली असली तरी तो एक कॉमेडियन आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्याने विनोदी भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे विलेनच्या रुपात त्याला पाहणं, त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरली.

आपल्या करिअरमध्ये सुनीलने १७७ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सुनीलने तेलुगुशिवाय, साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सुनील जेव्हा पाच वर्षांचे होते, तेव्हा त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. सुनीलने आपल्या होमटाऊन भीमावरमच्या एका डायगनॉस्टिक सेंटरमध्ये असिस्टेंट अकाऊंटेंटची नोकरी केली होती.

pushpa movie mangalam srinu
pushpa movie mangalam srinu

फाइन आर्ट्समध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावले. त्याला सुरुवातीला यश मिळाले नाही. नंतर तो हैदराबादला आला. त्याचा मित्र आणि तेलुगु चित्रपटांचे मोठे दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवाससोबत तो रूम शेअर करून राहायचा.

सुनील साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा मोठा फॅन होता. तो मंदिरात जाऊन तासनतास चिरंजीवीचे डान्स स्टेप्स कॉपी करायचा. यानंतर त्याला तीन ते चार चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम मिळालं. पुढे उंच, साजेशी शरीरयष्टी आणि भारदस्त आवाजामुळे चित्रपट मिळाले.

pushpa movie mangalam srinu
pushpa movie mangalam srinu

पुढे सुनीलने १९९६ मध्ये पवन कल्याणचा चित्रपट अकडा इंबई, इकाडा इंबईमध्ये काम केलं. या चित्रपटात त्याला फारशी प्रसिध्दी मिळाली नाही. चार वर्षे तो काम शोधत राहिला. अनेक चित्रपट डब्बा बंद झाले. र्दी प्रतीक्षेनंतर त्याला चित्रपटामध्ये कॉमेडी भूमिका मिळाल्या. आपल्या कॉमिक टायमिंगमुळे तो साऊथचा सर्वात लोकप्रिय कॉमेडियन झाला.

राजामौलींच्या चित्रपटांमध्ये काम

२००७ ते २०१० यादरम्यान, सुनीलने पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये काम कले. मुन्नाभाई एमबीबीएसचा रीमेक चित्रपट शंकर दादा एमबीबीएसमध्येही सुनीलने काम केलं होतं. याशिवाय त्याने एस. एस. राजामौलीच्या मगधीरामध्येही काम केलं. २०१० मध्ये सुनील एस. एस. राजमौलीचा चित्रपट मर्यादा रमन्नामध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. साऊथ चित्रपट इंडस्ट्रीत २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुष्पामध्ये त्याने विलेन मंगलम शीनूची भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil (@suniltollywood)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil (@suniltollywood)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil (@suniltollywood)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news