Uttarakhand CM : पराभवानंतरही पुष्कर सिंह धामीच उत्तराखंडचे मुख्यमंत्री!

Uttarakhand CM : पराभवानंतरही पुष्कर सिंह धामीच उत्तराखंडचे मुख्यमंत्री!
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : Uttarakhand CM : पुष्कर सिंह धामी यांच्या गळ्यात पुन्हा एकदा उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची माळ पडणार आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीत भाजपचे केंद्रीय निरीक्षक राजनाथ सिंह आणि मीनाक्षी लेखी उपस्थित होत्या. धामी हे बुधवार दि. २३ मार्च रोजी दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे समजते आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीत खतिमा मतदारसंघातून पुष्कर सिंह धामी यांचा पराभव झाला होता. त्यामुळे इतर नेत्यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी दावा करण्यास सुरुवात केली होती. पण, अखेर धामी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

भाजप विधिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे नाव आघाडीवर होते. त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. यासह उत्तराखंडला १२वे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांचा चेहरा मिळाला आहे. १० मार्च रोजी निवडणुकीच्या निकालानंतर, भाजपने उत्तराखंडमध्ये बहुमताचा जादूई आकडा गाठला होता. परंतु मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आपली जागा वाचवू शकले नाहीत. त्यांचा पराभव झाला होता. धामी यांना खतिमा विधानसभा मतदारसंघातून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा काँग्रेसच्या भुवन कापरी यांनी ६००० हून अधिक मतांनी पराभव केला. मात्र, निवडणूक हरल्यानंतरही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धामी यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Uttarakhand CM)

उत्तराखंडमध्ये भाजपने बहुमत मिळवले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही पक्षाचे सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन होणार आहे. उत्तराखंडच्या २० वर्षांच्या या प्रवासात राज्याला ११ मुख्यमंत्री मिळाले आहेत. भाजपने सात तर काँग्रेसने तीन मुख्यमंत्री राज्याला दिले आहेत. (Uttarakhand CM)

हेही वाचलं का  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news