लॉकडाऊन उठले अन बीआरटीने कात टाकली | पुढारी

लॉकडाऊन उठले अन बीआरटीने कात टाकली

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर : पिंपरी- चिंचवडमधील निगडी ते दापोडी, सांगवी ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता या मार्गांवर बीआरटी बससेवा सुरू करण्यात आली.

पुणे-मुंबई महामार्ग वगळता इतर मार्गांवर बीआरटीने कात टाकली आहे. कोरोना काळात ‘पीएमपी’ अत्यावश्यक सेवेसाठीच धावत होती. लॉकडाऊन उठल्यावर 95 टक्के बस बीआरटी मार्गावर धावत आहेत. निगडी-दापोडी बीआरटी रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे बीआरटी बसच्या ऑपरेशनमध्ये सातत्य दिसत नाही.

‘कृषी कायदे रद्द करणे केंद्र सरकारची मोठी चूक’

2007 मध्ये जेएनएनयूआरएम अंतर्गत शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी बीआरटी प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले. रस्ते सुधारणा करण्यासाठी 45 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला मान्यता देण्यात आली.

निगडी ते दापोडी (साडेबारा किलोमीटर लांब व 61 मीटर रुंद) सांगवी ते किवळे (साडे चौदा किलोमीटर रुंद आणि ताथवडेपर्यंत 45 मीटर, ताथवडे ते मुकाई चौकापर्यंत 30 मीटर रुंद रस्ता )

‘हिंमत असेल तर आमदार केसरकर यांनी कोकण आयुक्तांवर हक्कभंग आणावा’

नाशिक फाटा ते वाकड ( आठ किलो मीटर व रुंदी 45 मीटर), काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता (10.25 किलोमीटर व रुंदी चिखली स्पाईन रस्त्यापर्यंत 45 मीटर ,स्पाईन रस्ता ते चिंचवडगाव 30 मीटर)

या रस्त्यांचा विकास झाला. यातील सांगवी-किवळे रस्त्यावरील बीआरटीला 38 टक्के प्रवासी वाढ तर 33 टक्के महसुलात वाढ 2015 ते 2017 पर्यंत दिसून आली.

7 क्रिकेटपटू ज्यांनी IPL मध्ये फक्त एकच सामना खेळला आणि त्यानंतर…

काळेवाडी फाटा रस्त्यावर बस संख्या कमी असल्याने प्रभावी परिचालन करणे पीएमपीला अडचणीचे ठरत आहे.नाशिक फाटा- वाकड रस्त्यावर प्रवासी संख्येत 80 टक्के वाढ तर महसुलात 40 टक्के वाढ झाली.

कोरोनामुळे सार्वजनिक वाहतुकीला फटका बसला. ट्रिपा आणि प्रवासी कमी हे चित्र होते आता हे चित्र बदलले आहे. मात्र, पुणे-मुंबई महामार्गावर असलेला ग्रेड सेपरेटर प्रकल्प, त्यामुळे चिंचोळे झालेले सेवा रस्ते, बीआरटीत इतर वाहनांची घुसखोरी, मेट्रोचे सुरू असलेले काम यामुळे निगडी-दापोडी रस्त्यावर बीआरटीचे गणित बिघडले आहे.

सर्व प्रौढांना बूस्टर डोस देण्याची सरकारची योजना

“लॉकडाऊन काळात पीएमपीएमएलसेवा अत्यावश्यक सेवेसाठीच उपलब्ध होती. लॉकडाऊन उठल्यानंतर टप्याटप्याने बस मार्गावर आणल्या गेल्या. सध्या 95 टक्के बस
धावत आहेत.”
-सतीश गव्हाणे, बीआरटी प्रमुख, पीएमपीएमएल

 

Back to top button