Punjab Internet & SMS services: पंजाबमधील काही जिल्‍ह्यांतील इंटरनेट सेवा आणखी ४८ तास बंद राहणार

Punjab Internet & SMS services: पंजाबमधील काही जिल्‍ह्यांतील  इंटरनेट सेवा आणखी ४८ तास बंद राहणार

पुढारी ऑनलाईन : खलिस्तान समर्थक आणि 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या अटकेसाठी पंजाब सरकार आणि पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव रविवारपासूनच (दि.१९) पंजाबमध्ये इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद (Punjab Internet & SMS services) करण्यात आल्या आहेत. आज ( दि. २१ ) यामध्‍ये आणखी ४८ तासांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे २३ मार्चच्या दुपारपर्यंत पंजाबमधील संपूर्ण इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद राहतील, अशी माहिती पंजाब सरकारच्‍या सूत्रांनी दिली.

पंजाब सरकारने दिलेल्या आदेशानुसार, पंजाबमधील तरनतारन, फिरोजपूर, मोगा, संगरूर, अमृतसरमधील उपविभाग ऐनाळा या जिल्ह्यांमध्ये सर्व मोबाइल इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा (बँकिंग आणि मोबाइल रिचार्ज वगळता) आणि मोबाइल नेटवर्कवर प्रदान केल्या जाणार्‍या सर्व डोंगल सेवा (व्हॉईस कॉल वगळता) (Punjab Internet & SMS services) निलंबित राहतील, असे सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानी एजन्सी आणि दहशतवादी संघटनांकडून सोशल मीडियावर (Punjab Internet & SMS services)  चुकीची माहिती पसरवली जात आहे. राज्यातील कायदा व सुव्‍यवस्‍था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पंजाबमधील ही परिस्थिती शांततापूर्ण मार्गाने हाताळण्यासाठी आणि कायदा सुव्यस्था लक्षात घेता, पंजाब सरकारने इंटरनेट आणि एसएमएस सेवेवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुन्हा दोन दिवस वाढ केली आहे.

अमृतपाल  पंजाबमधून पसार झाल्‍याचा संशय

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी फरारी घोषित केले. यानंतर अमृतपाल सिंग यांच्या साथीदारांना पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचे काका हरजित सिंग आणि ड्रायव्हर यांनी देखील पंजाब पोलिसांपुढे शरणागती पत्‍करली आहे. अमृतपाल सिंगला अटक करण्‍यासाठी पंजाब पोलिस शर्तीचे प्रयत्न करत आहेत. अमृतपालने पंजाबच्या सीमा ओलांडल्या असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान, केंद्राने अमृतपाल सिंग अजूनही भारतात आहेत का? अशी विचारणा करत बीएसएफ, 'एसएसबी'ला सीमेवरील चौक्यांवर सतर्क राहण्यास सांगितले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सीमांवरील गस्त वाढवण्यात आली असून सीमाभागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news