Pune News : खडकवासला भागात मंत्री, नेत्यांना प्रवेशबंदी

Pune News : खडकवासला भागात मंत्री, नेत्यांना प्रवेशबंदी

खडकवासला : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत खडकवासल्यासह पश्चिम हवेली भागात सर्वपक्षीय नेत्यांसह एकाही आमदार, मंत्र्याला पाय ठेवू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. तसे फलकही गावोगावी लावण्यात
आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी खडकवासला येथील महात्मा चौकात, तसेच पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर येथे मराठा समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

खडकवासला येथे राजेंद्र कुंजीर, आबा जगताप, नितीन वाघ, विजय मते, नंदकिशोर मते, सौरभ मते, विलास मते, अमोल मते, राहुल मते, महेश मते,अनिल प्रसाद मते, शेखर मते, अतुल मते, महादेव मते, मोहन मते, दीपक मते आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले होते. प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. खानापूर येथील श्री विठ्ठल मंदिरात लाक्षणिक उपोषण केल्यानंतर मंदिरापासून मुख्य पानशेत रस्त्यावर मोर्चा काढण्यात आला.

एस.टी. स्टॅण्डवर या मोर्चाची सांगता करण्यात आली. राहुल मते म्हणाले, 'जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमदार, मंत्र्यांसह सर्व राजकीय नेत्यांस या भागात प्रवेश मिळणार नाही. सरकारने मनोज जरांगे पाटील यांचा अंत न पाहता, तत्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे.'

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news