Pune News : रांगोळीतून जरांगे पाटील यांना पाठिंबा | पुढारी

Pune News : रांगोळीतून जरांगे पाटील यांना पाठिंबा

खडकवासला : पानशेत धरणाजवळील डावजे येथील ग्रामस्थांनी विठ्ठल मंदिरात काकड आरती व रांगोळी रेखाटून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविला. डावजे येथे काकड आरतीच्या पहिल्या दिवशी सूरज मानकर, तुषार मानकर, प्रल्हाद मानकर व युवकांनी मंदिरात रांगोळीतून मनोज जरांगे पाटील यांचे चित्र रेखाटले.

टाळ-मृदंगाच्या तालावर काकड आरतीचे भजन सुरू झाले. वारकरी, भाविकांनी हरिनामाच्या गजरात जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. सूरज मानकर म्हणाले, गोरगरीब, कष्टकरी मराठ्यांच्या मुलाबाळांच्या हक्कासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी डावजेसारख्या दुर्गम छोट्या खेड्यातील समाजबांधव सहभागी झाले आहेत.

हेही वाचा

Nashik News : बंदीवानाच्या पोटात आढळली चावी, कारागृहात खळबळ

मराठा आरक्षणासंबंधी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक

मुंबईची धडकन आजपासून पडद्याआड

Back to top button