पुणे-मुंबई महामार्ग उद्या दोन तास बंद; जुन्या महामार्गावरून वाहतूक वळवली

पुणे-मुंबई महामार्ग उद्या दोन तास बंद; जुन्या महामार्गावरून वाहतूक वळवली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळा येथे ग्रँटी बसवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.01) या महामार्गावर दुपारी 12 ते 2 या वेळेत पुण्याकडे जाणारी वाहतूक पुर्णत: बंद राहणार आहे.

दरम्यान, वाहतूक खंडाळा एक्झिट मार्ग म्हणजेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळविण्यात आली आहे. वळवण येथील नाक्यावरून पुन्हा पुण्याच्या दिशेने द्रुतगती मार्गावरून जाता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news