Jawan Trailer Shah Rukh vs Sameer Wankhede : ‘जवान’च्या ट्रेलरमधून शाहरुखचा समीर वानखेडेंना इशारा? किंग खानचा ‘तो’ डायलॉग चर्चेत | पुढारी

Jawan Trailer Shah Rukh vs Sameer Wankhede : 'जवान'च्या ट्रेलरमधून शाहरुखचा समीर वानखेडेंना इशारा? किंग खानचा ‘तो’ डायलॉग चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jawan Trailer Shah Rukh vs Sameer Wankhede : शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी (दि. 31) रिलीज झाला. त्यातील थरारक सीन्स ते शाहरुखच्या वैविध्यपूर्ण लूक्सवर सिनेसृष्टीत जोरदार चर्चा रंगली आहे. असे असतानाच ट्रेलरमधील शाहरुखच्या एका डायलॉगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या डायलॉगचा त्याचा मुलगा आर्यनशी संबंधीत असल्याचे नेटक-यांनी म्हटले आहे. या डायलॉगमधून किंग खानने थेट एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंना इशारा केल्याचेही नेटक-यांचे म्हणणे आहे. दरम्यान ट्रेलरमधील त्या डायलॉगची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. वानखेडे हे तेच अधिकारी आहेत ज्यांनी आर्यनला ड्रग्स प्रकरणी अटक केली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुखच्या ‘जवान’ या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्या चित्रपटाचा तीन मिनिटांचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘जवान’ या चित्रपटाच्या ट्रेलरच्या शेवटी शाहरुखचा एक डायलॉग आहे. त्यात तो म्हणतो, ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर.’ शाहरुखचा हाच डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शाहरुखने या डायलॉगद्वारे समीर वानखेडेंना टोला लगावला आहे, असे नेटकरी चर्चा करत आहेत. ट्विटरवरही हाच डायलॉग ट्रेंड होत आहे. समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती.

ट्रेलर पाहून शाहरुखचे चाहते सुखावले आहेत. ॲक्शन, ड्रामा, थ्रिल या सर्व गोष्टींचा भरणा असणा-या या चित्रपटाचा ट्रेलरपाहूनच तो हिट होईल असा चाहत्यांना विश्वास आहे. नेटकरी शाहरुखच्या त्या डायलॉगचा संबंध एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी जोडत आहेत. मुलगा आर्यन खानसोबत घडलेल्या घटनेचा सूड किंग खानने जवान चित्रपटाच्या माध्यमातून घेतला आहे का? अशी खमंग चर्चा सुरू झाली आहे.

शाहरुख खान vs समीर वानखेडे काय आहे वाद?

2 ऑक्टोबर 2021 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने एका क्रूझवर छापा टाकला होता. त्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू होती आणि त्या पाऋतीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा सहभाग होता असा दावा त्या छाप्यादरम्यान करण्यात आला होता. एनसीबीच्या त्या कारवाईत आर्यन खानसह अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईतील एनसीबीची कमान समीर वानखेडे यांच्या हाती होती. आर्यन खान जवळपास 26 दिवस तुरुंगात होता आणि नंतर त्याला कोर्टातून जामीन मिळाला.

Back to top button