Pune jilha bank : आमदार अशोक पवार, विकास दांगट, सुनील चांदेरे विजयी

Pune jilha bank :  आमदार अशोक पवार, विकास दांगट, सुनील चांदेरे विजयी
Published on
Updated on

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीत (Pune jilha bank) तालुका विकास सोसायटी अ वर्ग मतदारसंघातून शिरूरमधून आमदार अशोक पवार, हवेलीमधून विकास दांगट आणि मुळशी तालुक्यातून सुनील चांदेरे विजयी झाले आहेत. याबाबतची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी केली.

जिल्हा बँकेवर यापूर्वीच २१ पैकी १४ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ७ जागांसाठी रविवारी मतदान झाले. आज सकाळी अल्पबचत भवन येथे मतमोजणीस सुरुवात झाली.

Pune jilha bank : फटक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण

निकालावेळी समर्थकांनी भवनाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. या वर्गातील निवडणूक निकाल घोषित करताच कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.

विजयी उमेदवारांची नावे व मिळालेली मते पुढीलप्रमाणे : शिरूर : एकूण मते १३१ : वैध १३०, अवैध १ : आमदार अशोक पवार १०९ विजयी. आबासाहेब गव्हाणे २१ पराभूत

हवेली अ वर्ग मतदार संघ : एकूण मते १३२ अवैध १, विकास दांगट ७३ विजयी, प्रकाश म्हस्के ५८ पराभूत .

मुळशी अ वर्ग मतदार संघ : एकूण मते ४५ , सर्व वैध. सुनील चांदेरे २७ विजयी, आत्माराम कलाटे १८ पराभूत

शिरूर अ वर्ग मतदारस संघातून विजयी उमेदवार आमदार अशोक पवार.

क वर्ग मतदार संघातून प्रदीप कंद यांनी विजय मिळवला.

पुणे जिल्हा बँकेच्या महिला राखीव मतदात संघातील दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या सहकार पॅनेलच्या दोन्ही महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यामध्ये निर्मला जागडे (पानशेत-वेल्हा), पूजा बुट्टे पाटील (कल्याण पेठ-ता. जुन्नर) या विजयी झाल्या आहेत.

या मतदार संघात ३ हजार ३९४ मतदान झाले होते, त्यापैकी ३ हजार ३६९ वैध मते तर २५ मते अवैध निघाली. त्यामध्ये जागडे यांना २ हजार ४८८ तर पूजा बुट्टे पाटील यांना २ हजार ७४९ मते मिळाली. तर पराभूत झालेल्या भाजपच्या आशाताई बुचके यांना ९३३ मते मिळाली

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news