TATA Motors : भारतीयांच्या मनावर आदिराज्य गाजवणारी टाटा सफारी आता आली स्वस्तात आणि नव्या रुपात

TATA Motors : भारतीयांच्या मनावर आदिराज्य गाजवणारी टाटा सफारी आता आली स्वस्तात आणि नव्या रुपात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : TATA Motors कडून ७ सीटरमध्ये मागच्या कित्येक वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीच्या TATA Safari चे नवे मॉडेल बाजारात आणले आहे. टाटाकडून SUV मध्ये ९ ऑटोमेटिक व्हेरियंट्स गाड्या बाजारात आणल्या आहेत. दरम्यान याची किंमत १४ लाख ९९ हजार पासून ते २३ लाखांपर्यंत असणार आहे.

यामध्ये XMA, XTA+, XZA, XZA+ 6-seater, XZA+, XZA+ 6-seater Adventure Edition, XZA+ Adventure Edition, XZA+ Gold 6-seater आणि XZA+ Gold व्हेरियंट्समध्ये असणार आहेत.

सध्या नव्या वर्षात XMA आणि XZA या व्हेरियंट्समधील गाड्यांची टाटाकडून 3,000 रुपयांपर्यंत किंमत वाढवण्यात आली आहे. तर ऑटोमेटिक व्हेरियंट्स गाड्यांच्या 2,000 रुपयांपर्यंत किमती वाढवल्या आहेत.

TATA Motors : इंजिन आणि गिअरबॉक्स

या कारची इंजिन सिस्टीम अत्यंत स्मूथ काढण्यात आली आहे. या कारला 2.0 लिटर क्रायोटेक टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. सफारीसोबत टाटाच्या हॅरियरमध्येही या इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 170hp पॉवर जनरेट करणारे आहे. याशिवाय कारमध्ये सहा स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच ही कार 4 व्हील ड्राइव्ह प्रणालीसह येते.

टाटा सफारीकडून महिंद्रा XUV700, MG Hector Plus, Hyundai Alcazar आणि Maruti XL6 या वाहनांना टक्कर देत आहे. याचबरोबर अन्य SUV आणि MPV वाहनांनाही ही गाडी टक्कर देत आहे.

एडिशन सारख्या ट्रीम लेव्हलमध्ये सफारीचे २० प्रकार

नवीन Tata Safari भारतात रु. १४ लाख ९९ हजार ते २३ लाख १७ हजारांपर्यंत (एक्स-शोरूम) किंमतीमध्ये उपलब्ध असणार आहे. XE, XM, XT, XT+, XZ, XZ+ आणि XZ+ गोल्ड एडिशन सारख्या ट्रीम लेव्हलमध्ये सफारीचे २० प्रकार आहेत. ६ आणि ७ सीटर या दोन पर्यायांमध्ये या गाडीची रचना करण्यात आली आहे.

ही गाडी SUV 1956 cc पर्यंत डिझेलमध्ये उपलब्ध असणार आहे. ही गाडी १६७.६२ Bhp पर्यंत पॉवर जनरेट करू शकते. टाटा सफारी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ही गाडी रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. टाटा सफारीचे मायलेज १६.१४ kmpl पर्यंत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news