पुढारी ऑनलाईन: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार यांच्या समर्थकांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून पदमुक्त करण्याचा सपाटा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लावला आहे. तर अजित पवार यांनी स्वत:ला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करून प्रदेशाध्यक्षपासून तर विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. अशातच जयंत पाटील यांनी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची हकालपट्टी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नुकतेच गारटकर यांना पक्षातून बडतर्फ करत असल्याचे पत्र दिले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, २ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये पक्षातील काही विद्यमान आमदारांनी सहभागी होऊन मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सदर कृत्य पक्षविरोधी असून या आमदारांविरोधात पक्षाने अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे. या सदस्यांना गारटकर यांनी जाहीर पाठिंबा दिला असल्याचे समजले. त्यांची ही कृती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत व पक्षविरोधी आहे. म्हणूनच २ जुलै २०२३ पासून पक्षाच्या सदस्यत्वावरुन व पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे. तसेच गारटकर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा: