पुढारी ऑनलाईन: भारतातील स्पाईसजेट लि.च्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर उड्डाण व्यत्ययांचा सामना करावा लागत आहे. वेगाने वाढणाऱ्या विमान बाजारपेठेत सर्वाधिक स्पाईसजेट लि. ही विलंबाने उड्डाण करणारी एअरलाइन बनली आहे. गेल्या मे महिन्यात भारतातील प्रमुख विमानतळांवरून स्पाईसजेटच्या केवळ 61% विमानांनी वेळेवर उड्डाणे केली आहेत. तसेच एप्रिलमध्ये हे प्रमाण जवळपास 70 टक्क्यांच्या आसपास होते. दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विमान वाहक कंपनी एअर इंडियाही वेळेवर उड्डाण करण्यात मागे राहिली आहे.
विमान उड्डाणासाठी वारंवार होणारा विलंब कोविडनंतरच्या भरभराटीच्या काळात भारताच्या तीव्र स्पर्धात्मक विमान वाहतूक बाजारातील आव्हाने अधोरेखित करतात.गे ल्या मे आणि जून महिन्यांत शालेय सुट्ट्यांमध्ये प्रवासातील वाढीमुळे विमान कंपन्यांच्या क्षमतेवर ताण आला आणि Go Airlines India Ltd. ने तिकीट विक्री स्थगित केल्याने फ्लाइट नेटवर्कवर दबाव वाढला.
मे महिन्यामध्ये देशांतर्गत प्रवासी वाहतूक 15% ने वाढून 13.2 दशलक्ष एवढी झाली, परंतु एअरलाइन्सने कोविड काळात ग्राउंडिंग केल्यानंतर कर्मचारी आणि विमानांच्या कमतरतेचा सामना केला. प्रॅट अँड व्हिटनी इंजिनच्या जागतिक समस्येमुळे परिस्थिती बिघडली, परिणामी भारतीय बाजारपेठेत सेवा देणारी असंख्य विमाने जमिनीवर उभी आहेत.
स्टार एअर कन्सल्टिंगचे अध्यक्ष हर्ष वर्धन यांच्या मते, विमान कंपन्यांवर सेवांचा विस्तार करण्यासाठी प्रचंड दबाव आहे. परंतु, तरीही अचानक वाढलेल्या वाहतुकीला तोंड देण्यासाठी त्यांचे ऑपरेशन सुलभ करत आहेत. प्रतिकूल हवामानामुळे विमान उड्डाणात व्यत्यय आला आणि त्यामुळे सोशल मीडियावर निराश प्रवाशांच्या तक्रारींचा पूर आला. उदाहरणार्थ, नवी दिल्लीत वेदर किलियरन्सची वाट पाहत असताना पायलटने कामाचे तास पूर्ण झाल्याने विमान उड्डाणास नकार दिला. परिणामी 350 एअर इंडियाचे प्रवासी जयपूरमध्ये अडकले होते.
स्पाईसजेटला विमान उड्डाण विलंबाने होण्याबरोबरच आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार वर्षांत $40 अब्जचे नुकसान झाले आहे. एअरलाइनने आपले नवीनतम आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर करण्यास विलंब केला आणि दोन डझनहून अधिक विमाने बंद केली, ज्यामुळे वर्षाच्या सुरुवातीपासून बाजारातील हिस्सा 7.3% वरून 5.4% पर्यंत घसरला.
अडचणी असूनही इतर प्रमुख विमान बाजारांच्या तुलनेत भारतात उड्डाण विलंब तुलनेने कमी आहे. FlightAware डेटा दर्शवितो की, जानेवारी ते 20 जून या कालावधीत यूकेमधील 30% आणि यूएसमधील 20% च्या तुलनेत भारतात फक्त 15% निर्गमनांना विलंब झाला.
हेही वाचा: