‘एनआयए’चे चार राज्‍यांमध्‍ये छापे, काय आहे ‘गजवा-ए-हिंद’ मॉड्यूल ?

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारमधील गजवा-ए-हिंद ( Ghazwa-e-Hind ) या पाकिस्‍तान पुरस्‍कृत दहशतवाद प्रसार मॉड्यूल प्रकरणी आज (दि.२६) राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (NIA) एकाचवेळी चार राज्‍यांमध्‍ये छापे टाकण्‍यात आले. मध्‍य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि केरळमध्‍ये ही कारवाई करण्‍यात आल्‍याची माहिती 'एनआयए' टिव्टच्या माध्यमातून दिली आहे.

संशयित पाकिस्‍तानी हँडलर्सच्‍या संपर्कात

एनआयएने मध्य प्रदेशातील देवास, गुजरातमधील गीर सोमनाथ, उत्तर प्रदेशातील आझमगढ आणि केरळमधील कोझिकोड येथे पाकिस्तान पुरस्‍कृत गझवा-ए-हिंद प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्‍हणून ही कारवाई केली. राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने म्‍हटले आहे की, "या कारवाईमध्‍ये संशयितांचे संबंध उघड झाले आहेत. संबंधितांच्‍या परिसराची आज झडती घेण्यात आली. हे संशयित त्यांच्या पाकिस्तानस्थित हँडलर्सच्‍या संपर्कात होते. भारतविरोधी विचारांचा प्रचार करण्यात गुंतलेले होते. छाप्‍यात अधिकार्‍यांनी मोबाईल फोन, सिमकार्ड आणि कागदपत्रे जप्‍त करण्‍यात आली आहेत "

काय आहे 'Ghazwa-e-Hind' प्रकरण?

गजवा-ए-हिंद दहशतवादाच्‍या प्रसाराचे बिहारमध्ये उघडकीस आलेले प्रकरण आहे. या मॉड्यूलचा पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आणि भारतात हल्ले करण्याची योजना असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा सुरुवातीला बिहार पोलिसांनी तपास केला, झैन नावाच्या पाकिस्तानी नागरिकाने तयार केलेल्या 'गजवा-ए-हिंद' नावाच्‍या व्हॉट्स ॲप ग्रुपचा ॲडमिन मरघूब अहमद दानिश याच्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

जुलै 2022 मध्ये या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांनी 'एनआयए'कडे सोपवला होता. मारघूब अहमद दानिश यांच्याविरुद्ध 'एनआयए'ने आरोपपत्र दाखल केले. आरोपी मारघूब याने भारतासह पाकिस्तान, बांगलादेश आणि येमेनसह इतर देशांतील अनेकांना व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये जोडले होते. टेलीग्राम आणि बीआयपी मेसेंजर यांसारख्या इतर प्लॅटफॉर्मवरही आपले ग्रुप तयार केले.

तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा कट

एनआयएने आरोपपत्रात स्‍पष्‍ट केले आहे की, मरघूबचा उद्देश भारतात 'गजवा-ए-हिंद' (Ghazwa-e-Hind) स्थापन करण्याच्या नावाखाली तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा आहे. तर 'एनआयए' अधिका-यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, भारतभर दहशतवादी कारवाया करण्यासाठी स्लीपर सेल तयार करण्याच्या हेतूने तो गट सदस्यांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news