UPSC Topper Priyamvada Mhaddalkar : प्रियंवदाने जर्मन बँकेतील नोकरी सोडून केली परीक्षेची तयारी

UPSC Topper Priyamvada Mhaddalkar : प्रियंवदाने जर्मन बँकेतील नोकरी सोडून केली परीक्षेची तयारी
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आधी इंजिनिअरिंगची पदवी घेतली त्यानंतर बेंगलोर येथून एमबीएचे शिक्षण घेतलं. तेथून थेट जर्मनी भाषा शिकून जर्मन बँकेत उच्चपदस्त नोकरी पटकावली. मग पुन्हा भारतात येऊन आयएएस होत मराठमोळ्या प्रियंवदा म्हाडदळकर (UPSC Topper Priyamvada Mhaddalkar) हिने गरुड भरारी घेतली आहे. मुंबईच्या प्रियंवदाने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात युपीएससी (UPSCupsc Result 2021) परीक्षेत यश मिळवत महाराष्ट्रात पहिला (UPSC Topper in Maharashtra 2022) तर देशात १३ व्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळवला आहे.

युपीएससी परीक्षेचा सोमवारी निकाल जाहीर झाला. परीक्षेत दिल्लीच्या श्रृती शर्मा हिने देशात पहिला येण्याचा मान मिळविला. तसेच मुंबईच्या प्रियंवदा म्हाडदळकरही (UPSC Topper Priyamvada Mhaddalkar)  महाराष्ट्रात पहिला येत देशात १३ व्या स्थानी आली. अभियांत्रिकीची पदवी, एमबीए, जर्मन भाषेचे शिक्षण, जर्मन बँकेत ६ वर्षे नोकरी केल्यानंतर तिने भारतात येऊन अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात आयएएस परीक्षेत अवघवीत यश प्राप्त केलं आहे.

जन्मगाव रत्नागिरी असलेल्या प्रियंवदाचे (UPSC Topper Priyamvada Mhaddalkar) बालपण मुंबईत गेले. मुंबईतील डी.जी.रुपारेल महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. व्हीजेटीआयमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग क्षेत्रात पदवी घेतली. पुढे तिने आयआयएम बेंगलोर येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणाच्या जोरावर तिने थेट जर्मनी गाठत तेथील डॉएश्च बँकेत तब्बल ६ वर्षे सेवा बजावली. या बँकेत ती असिस्टंट व्हाईस प्रेसिंडेंट या पदावर कार्यरत होती. या दरम्यान तिने जर्मन भाषेचे देखिल ज्ञान संपादन केले आहे. सर्व काही सुरळीत सुरु असताना तिला पुन्हा भारतात परतावे असे वाटले. येथे येऊन तिने थेट युपीएसच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला आणि अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात तीने थेट आयएएस पदाला गवसणी घातली आहे. तिची सर्व कामगिरी पहाता सामन्याला थक्कच करणारी आहे. सामान्य मराठी कुटुंबातून येऊन अशी गरुड भरारी घेत ती आता सर्वांचे प्रेरणास्थान ठरत आहे.

परीक्षेची तयारी

प्रियंवदाचे वडिल सरकारी सेवेत कार्यरत होते. तिला वडिलांकडूनच सरकारी सेवेत रुजू होण्याची प्रेरणा मिळाली. भारतात येऊन युपीएससीची तयारी सुरु केली. नियोजनबद्ध अभ्यास, सराव आणि वैकल्पिक विषयांवर भर दिला. अभ्यास करताना वैकल्पिक विषयाचा आवाका मोठा असल्याने त्यावर खूप भर दिला, भरपूर सराव आणि अभ्यासातला नियमितपणा हे यशाचे गमक असल्याचे ती म्हणाली. मुलाखत देण्यासाठी माहिती आणि चालू घडामोडी या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. मुख्य परीक्षा झाल्यावर मी त्याचा दोन ते तीन महिने नीट अभ्यास केला.

मुख्य परीक्षेत एखाद्या गोष्टीवर बोलायचे असते किंवा लिहायचे असते. मात्र मुलाखतीत या उत्तरांचा रोख बदललेला असतो. तिथे अगदी मुद्देसूद बोलावे लागते. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मी अभ्यास केला. या यशात त्यांच्या घरच्यांचा, नवर्‍याचा आणि सासरच्यांचा खूप मोठा वाटा असल्याचे त्या सांगतात.

समाजासाठी काहीतरी करण्यासाठी परीक्षेकडे वळलो

समाजासाठी काहीतरी करायला हवे या जाणिवेतून परीक्षेकडे वळलो, आता यश मिळाले आहे. समाजासाठी काम करण्यासाठी आता झोकून द्यायचे, असेही त्यांनी सांगितले. तिची सर्व कामगिरी पाहता सर्वसामन्याला थक्कच करणारी आहे. सामान्य मराठी कुटुंबातून येऊन अशी गरुड भरारी घेत ती आता सर्वांचे प्रेरणास्थान ठरत आहे.

प्रियंवदाचे चिपळूणशी नाते

प्रियंवदाचे वडील अशोक म्हाडदळकर हे कोकण विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापकपदावर असताना रत्नागिरी येथून सेवानिवृत्त झाले व चिपळुणातील वीरेश्‍वर कॉलनी येथे त्यांचे निवासस्थान आहे. मला आयएएस होण्याची इच्छा होती. त्यामुळे मी मन लावून अभ्यास केला. वडील सरकारी नोकरीत होते. त्यामुळे शासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा होती. आईचेही स्वप्न होते, असे ती म्हणाली.

माझे वडील हे माझे आदर्श होते. मला त्यांच्यासारखे व्हायचे होते, यामुळे लहानपणापासून माझे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते, चांगली नोकरी मिळाल्यानंतर मला मी माझे लहानपणाचे स्वप्न विसरल्याची जाणीव झाली. यामुळे मी नोकरी सोडून लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले आणि मला यश मिळाले.

– प्रियंवदा म्हाडदळकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news