Priya Prakash Varrier
Priya Prakash Varrier

Priya Prakash Varrier : ‘विंक गर्ल’ने गायलं पठानचं ब्लॉकबस्टर गाणं (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल क्रश आणि साऊथ अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरने पठान चित्रपटातील ब्लॉकबस्टर गाणं गायलं आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विंक गर्ल प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) ने सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट पठान (Pathaan) मधील सुपरहिट गाणे बेशर्म रंग आपल्या सुरेल आवाजात गायलं आहे. (Priya Prakash Varrier)

मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरने आपल्या अदाकारीने सर्वांनाच घायाळ केले आहे. आता दीपिका पादुकोन-शाहरुख खान स्टारर चित्रपट पठानमधील गाणे गायल्यामुळे ती आणखी चर्चेत आली आहे. तिने बेशर्म रंग गाण्याला सुंदर आवाज दिलाय. या आवाजाने चाहते मंत्रमुग्ध झाले आहेत. तिचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

तिने व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे, 'या गाण्याच्या प्रेमासाठी.' व्हिडिओमध्ये प्रिया प्रकाश ब्लॅक कॅप आणि ग्रीन टी-शर्ट घालून कूल लूकमध्ये दिसते. प्रिया प्रकाश या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आहेत. फॅन्स तिचे कौतुक करताना थकत नाहीत. फॅन्सचे म्हणणे आहे की, प्रियाने हे गाणे खूप चांगल्या पद्धतीने गायले आहे. एका युजरने लिहिलं, 'प्रिया तुझं गाणं वारंवार ऐकावसं वाटतं.' आणखी एका युजरने लिहिलं, 'हे गाणे ऐकून असं वाटत आहे की, हे गाणे प्रियानेचं गायले आहे.'

logo
Pudhari News
pudhari.news