Priya Bapat : प्रियाच्या फॅमिलीला पाहिलं का, बहिणही दिसते तितकीच सुंदर

priya bapat with father and sister shweta
priya bapat with father and sister shweta
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : खूप कमी लोकांना माहिती असावी की, अभिनेत्री प्रिया बापटला (Priya Bapat) सख्खी बहिण आहे. श्वेता असं तिच्या बहिणीचं नाव असून तिचे फोटो अनेकदा प्रिया सोशल मीडियावर शेअर करत असते. आता प्रियाने आपल्या बहिणीसमवेत एक फोटो शेअर केला आहे. शिवाय तिने आपल्या फॅमिलीचा फोटोदेखील शेअर केले आहेत. (Priya Bapat)

प्रियाने शेअर केलेल्या फोटोंना तिने कॅप्शन लिहिलीय-Family where life begins and love never ends!.The year has been tough for us as a family. Huge loss of loved ones. But we know we are there for each other. We have memories, we carry them in our hearts forever ❤️

याचसोबत तिने दिवाळीच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. यापैकी एका फोटोमध्ये ती वडील आणि बहिणीसोबत दिसते. श्वेता बापट ही प्रियाइतकीच सुंदर आहे. तिचे फोटो तुम्ही पाहू शकता. दोघींचे किती घट्ट नाते असल्याचे या फोटोंवरून दिसते.

प्रियाने एकदा फेसबूक पोस्ट लिहिली होती-'मी आणि माझी मोठी बहीण. आम्हा दोघींच नात वेगळच आहे. न भांडतां आम्ही राहत नाही. पण एकमेकींशिवाय जगूच शकत नाहीं. तुमच्या आयुष्यातही असेलचकी असं नातं.'

प्रिया बापट आणि श्वेताचा साडी ब्रॅण्डदेखील आहे. श्वेता बापट ही सेलिब्रेटी स्टायलिस्ट आणि कॉश्च्युम डिझायनर आहे. प्रिया आणि तिचा पती, अभिनेता उमेशची ती स्टायलिस्ट आहे. शिवाय ती अनेक कलाकारांची स्टायलिस्ट आहे. जाहिरातीसाठी श्वाताने काम केले आहे. तसेच मालिकांच्या टायटल सॉन्गसाठी तिने काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news