रविनाचा 16 आकडा फेव्हरिट | पुढारी

रविनाचा 16 आकडा फेव्हरिट

अभिनेत्री रविना टंडन गेल्या अनेक दशकांपासून सहज सुंदर अभिनयाने बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. रवीनाला गाड्यांची आवड आहे, हे आतापर्यंत सर्वांनाच माहीत झाले आहे. तिच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. विशेष म्हणजे तिच्या प्रत्येक गाडीचा नंबर सारखा आहे. याचे कारण तिने उघड केले आहे. रवीनाकडील सर्व गाड्यांच्या नंबर प्लेटमध्ये 16 हा आकडा आहे. यामागचे गुपितही तिने यावेळी उघड केले. आपण नेहमी शुभ दिनी गाडी खरेदी करतो. पण आमच्या प्रत्येक गाडीच्या नंबर प्लेटमध्ये 16 हा आकडा असतो, कारण माझ्या मुलीचा वाढदिवस 16 तारखेला असतो आणि आम्ही तिच्या वाढदिवशी प्रत्येक गाडी खरेदी करतो, असे रवीना म्हणाली. तिने तिची पहिली गाडी ती केवळ 18 वर्षांची असताना खरेदी केली होती. ती म्हणाली, एक जुनी स्पोर्टस् कार होती. ज्या दिवशी मी 18 वर्षांची झाली, तेव्हा मी माझी पहिली कार घेतली. ती गाडी सेकंड हँड होती. पण ती गाडी मी माझ्या पहिल्या कमाईने खरेदी केल्याने माझ्यासाठी ती खूप खास होती. त्यानंतर माझी पहिली नवी कोरी गाडी ही मारुती 1000 होती.

 

Back to top button