Faisal Khan : फैजल खानचा साधेपणा | पुढारी

Faisal Khan : फैजल खानचा साधेपणा

बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खान मोठ्या पडद्यावर हिट होऊ शकला नाही, पण त्याने चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान मात्र निर्माण केले आहे. त्याचा साधेपणा आणि खर्‍या आयुष्यात लोकांशी असलेले वागणे, विचार यामुळे त्याचे असंख्य चाहते आहे. सध्या फैजल खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतआहे. यात तो अत्यंत साधेपणाने दिवाळीची खरेदी करताना दिसत आहे. फैजल खान फूल विक्रेत्यांकडून वेगवेगळी फुले विकत घेत आहे. फैजल खान विक्रेत्यांकडून फुले विकत घेताना आणि त्यांना, मी रात्री उशिरा येऊन फुलांचे 15 हार घेऊन जाणार आहे. जेव्हा हार तयार होतील तेव्हा मला कॉल करा, मी स्वतः ते न्यायला येईन, असे सांगताना दिसत आहे. फैजलचा हा व्हिडीओ पाहून तो या फुल विक्रेत्यांशी नियमित संपर्कात असल्याचे दिसून येत आहे.

 

Back to top button